नेवासा
नेवासा तालुक्यातील सुरेगाव येथील सदगुरु नारायणगिरी आश्रमात महंत उध्दव महाराज मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय संतसंमेलन उत्साहात संपन्न झाले.उपस्थित संत,महंतांनी वारकरी संप्रदायातील विविध प्रश्नांवर चर्चा करुन आध्यात्मिक कार्याला नवीन उंची देण्याचा एकमुखी निर्णय घेतला.
आश्रमाच्या मुख्य सभागृहात झालेल्या कार्यक्रमात नारायणगिरी महाराज प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून संतसंमेलनाचे उदघाटन करण्यात आले.महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले किर्तनकार,प्रवचनकार,गायक, वादक,गुणिजन मंडळी उपस्थित होते.वारकरी संप्रदाय, वारकरी संप्रदायातील संतांनी ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून घालून दिलेल्या तत्वांवर मार्गक्रमण करणं, वारकरी संप्रदायाची सद्याची परिस्थिती, भविष्यातील आव्हाने,तरुण किर्तनकारांनी जबाबदारी आशा अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली.
प्रास्ताविक भाषणात शरद शास्री महाराज यांनी आश्रमात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती देवून संतसंमेलन आयोजन विषयी माहिती दिली.
भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील (मुंबई) यांनी आपल्या भाषणात वैश्विक समस्यांचे निराकरण करण्याची ताकद वारकरी संप्रदायात असल्याचे सांगून मोठ्यांनी लहानांना प्रेम द्यावं व लहानांनी मोठ्यांचा आदर राखावा असे सांगून मारणारा हात दिसतो मात्र मदतीचा हात दिसत नाही. वारकरी संप्रदायावर होणारे आक्रमक रोखण्यासाठी एकत्र यावे.माऊलीच्या ज्ञानेश्वरीचा ठेवा उर्जा म्हणून बरोबर असल्याचे त्यांनी सांगितले.
उध्दव महाराज मंडलिक यांनी आभार भाषणात घरातील माणसांनी घरातील माणसांबरोबर घराच्या उन्नतीसाठी काही गुजगोष्टी करण्यासाठी संतसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले.
संदिप महाराज खंडागळे (पैठण) राम महाराज बोचरे,शिवाजी महाराज काळे,सरोदे महाराज, जनार्धन महाराज मेटे(वैजापूर) कृष्णा महाराज हारदे, मृदुंगविशारद गिरीजनाथ महाराज जाधव(गंगापूर)रामनाथ महाराज पवार,ज्ञानेश्वर महाराज मधाने (वैजापूर),सुनीलगिरी महाराज,
नारायण आनंदगिरी महाराज (वैजापूर)यांनी मनोगत व्यक्त केले.देवगडचे प्रकाशानंदगिरी महाराज,तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी भेट दिली.पंढरीनाथ महाराज तांदळे,संजय महाराज जगताप, दादा महाराज वायसळ,बाळकृष्ण महाराज,ईश्वर महाराज कदम, भगवान महाराज डिके,दीपक महाराज देशमुख(अकोले)
मृदुंगमहर्षी युवराज महाराज देशमुख(आळंदी),आदिनाथ महाराज दुशिंग,भारत महाराज धावणे,भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव (शास्त्री), आबा महाराज कोळसे,बाबा महाराज मोरे, संजय महाराज शेटे, संगीतविशारद प्रकाश महाराज कातकडे,विजय महाराज पवार,महेश महाराज खाटेकर, शिवप्रसाद महाराज पंडित उपस्थित होते.
शरद शास्री महाराज यांनी लिहलेल्या संस्कार दीपिका पुस्तक प्रकाशित करीता संतसेवक नामदेवराव शिंदे सर यांनी एक लाख ७२ हजार रुपायाचा धनादेश पाटील महाराज यांच्या हस्ते उध्दव महाराज यांना दिला.यावेळी पसायदान-आनंदवनचे सदस्य विनायक दरंदले,संजय गर्जे, विवेक देशमुख, देवळालीप्रवरा भक्त मंडळ उपस्थित होते.
बाळासाहेब झिने यांनी सुत्रसंचालन केले.