Saturday, January 22, 2022

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह आठ राज्यांना केंद्राकडून विशेष निर्देश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात करोना संसर्गाचे प्रमाण वाढताना दिसत आहे, दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देखील आता विशेष पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर आता केंद्राकडून आठ राज्यांना विशेष निर्देशही देण्यात आले आहेत. केंद्राने आठ राज्यांना तयारी बळकट करण्यास आणि लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यास सांगितले आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिल्ली, हरियाणा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि झारखंड यांना पत्र लिहून कोविड-19 चाचण्या वाढवण्याचा, रुग्णालय स्तरावरील तयारी मजबूत करण्याचा, लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे.

करोनाच्या रुग्णांमध्ये अचानक झालेली वाढ पाहता केंद्राने या राज्यांना पत्र लिहून तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. मृत्यूदर वाढू नये यासाठी केंद्राने कठोर पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

केंद्राने या राज्यांना सांगितले की, दिल्लीत लागू करण्यात आलेले GRAP मॉडेल संपूर्ण देशात नेण्याचा विचार केला जात आहे.कोरोनाच्या नवीन प्रकारामुळे संसर्गाचा वेग वाढला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशातील एकूण ओमिक्रॉन संक्रमितांची संख्या ९६१ वर पोहोचली आहे. यामध्ये २६३ रुग्णांसह दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे, तर २५२ रुग्णांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!