Friday, December 3, 2021

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी वाढवलं अजित पवारांचं टेन्शन

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :राज्याच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष असले तरी संधी मिळताच दोघंही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.

आक्रमक असलेल्या नाना पटोलेंना राज्यातील काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षाचं सरकार असलं तरी काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात.

गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले इंदापूरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे.

इंदापूर तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला लोकं मानतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल. त्याचसोबत जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे.

मात्र संधी साधूसाठी जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे. सत्तेसाठी नाही अशांना काँग्रेसचं दार उघडं आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार आहे असा दावा नाना पटोलेंनी केला.मागील २ निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम

दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत. दत्तात्रय भरणे यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. नाना पटोलेंनी केलेल्या विधानामुळे दत्तात्रय भरणे आणि अजित पवार दोघांचेही टेन्शन वाढवलं आहे.

ताज्या बातम्या

मोठी बातमी:जे नको व्हायला पाहिजे तेच झाले:ओमिक्रॉनचा भारतात शिरकाव

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिअंटमुळे सध्या जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

माय महाराष्ट्र न्यूज:महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. खाकी वर्दीला कलंकित करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यात...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान

माय महाराष्ट्र न्यूज:मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश यादव असतील, ममता बॅनर्जी असतील. काँग्रेसचे आणि  भाजपाच साटंलोट असल्याचं...

नगर ब्रेकिंग : स्विफ्ट कार व मोटरसायकलचा मोठा अपघात तीन तरुण गंभीर जखमी

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर-नेवासा रस्त्यावर असणाऱ्या अजित पवार पॉलिटेक्निक कॉलेज, वडाळा महादेव च्या समोर नेवासाकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर एमएच.१८ ऐजे ८३६९ ने...

महाराष्ट्र शासनानं पुन्हा या नियमावलीत बदल

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार राज्य शाससानं काल विमान प्रवासासंदर्भात नियमावली जाहीर केली होती. त्यानुसार, इतर राज्यांतून महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या विमान...

त्या’ वक्तव्यावरुन बाळासाहेब थोरात संतापले राष्ट्रवादीच्या या मंत्र्यांला म्हणाले तेवढी पात्रताच नाही

माय महाराष्ट्र न्यूज:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबई दौऱ्यात केलेल्या टीकेनंतर राज्यात काँग्रेस नेत्यांनी नाराजीचा सूर लावला आहे. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून...
error: Content is protected !!