Monday, January 17, 2022

तरुणांविरुद्ध दाखल करायची बलात्काराचा गुन्हा, शारीरिक संबंध ठेवून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीला …

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गुरुग्राममधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अॅपच्या माध्यमातून अल्पवयीन तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या आणि नंतर ब्लॅकमेलिंग आणि खंडणीचा

खेळ सुरू करणाऱ्या अशा ‘वसुली गर्ल’ला अटक करण्यात पोलिसांच्या टीमला यश आलं आहे.पोलिसांत खोट्या तक्रारी दाखल करण्याची भीती दाखवून आरोपी तरुणी पीडित तरुणांकडून लाखो रुपयांची लूट करायची.

दुसरीकडे, एसीपी क्राईमच्या म्हणण्यानुसार, न्यू कॉलनी पोलिसांनी या 20 वर्षीय तरुणीला अटक करून ब्लॅकमेलिंग आणि वसुलीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या साऱ्या रॅकेटमध्ये तरुणीसोबत तिची आई आणि तिचा साथीदारही सामील होता.

आता पोलिसांनी तरुणीसह तिघांनाही अटक केली आहे. अद्यापही पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून या तिघांशिवाय इतर कोण-कोण सहभागी होते याचाही चौकशी सध्या सुरु आहे. गुरुग्रामचे एसीपी क्राइम प्रीतपाल सिंह यांनी ही माहिती दिली आहे.

तरुणीच्या जाळ्यात अडकलेल्या पीडित मुलाने सांगितले की, 20 ऑगस्ट रोजी त्याची आरोपी मुलीशी डेटिंग अॅपच्या माध्यमातून ओळख झाली होती. ज्यानंतर मुलीने त्याला हळूहळू आपल्या जाळ्यात गोवलं. एवढंच नव्हे तरुणीने तर दोनच दिवसात

त्याच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत तरुणीने तरुणाला लग्न करण्यास भाग पाडले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्ट इथेच थांबली नाही,

तर सोशल मीडिया किंवा डेटिंग अॅपच्या माध्यमातून पद्धतशीरपणे इतर काही तरुणांना अडकवून तरुणीने त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. यानंतर त्यांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून देखील तरुणी पैसे उकळायचे. या

सगळ्यातून तरुणीने लाखो रुपयांची वसुली केली आहे.पोलिसांच्या नोंदीनुसार, आरोपी तरुणीने राजेंद्र पार्क, न्यू कॉलनी, सेक्टर 10, सिव्हिल लाइन्स, डीएलएफ फेज-1 आणि सायबर क्राइम पोलिसात वर्षभरात एकूण 7 तरुणांविरुद्ध

 बलात्काराचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये पोलीस तपासात दोन प्रकरणे खोटे असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा शोध करुन तिला अटक केली.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!