Monday, January 17, 2022

शरद पवारांची परंपरा खोटं बोलण्याची

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: महाराष्ट्रात सध्या तीन मोठ्या राजकीय मुद्द्यांवरून राजकारण चांगलेच गाजत आहे. त्यात नारायण राणे विरुद्ध ठाकरे संघर्षाने याची सुरूवात झाली. त्यानंतर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमधील

लेटर वॉरने वातावरण तापवले आणि आता ऐन थंडीच्या दिवसात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या ऐतिहासिक पाहटेच्या शपथविधीवरून पुन्हा राजकारणाचे निखारे पेटले आहेत. शरद पवारांनी आजपर्यंत त्यावर खुली प्रतिक्रिया

दिली नव्हती, मात्र शरद पवार बोलले आणि दुसरीकडून भाजप नेतेही सुरू झाले. शरद पवारांच्या याच वक्तव्यावरून चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना काही तिखट सवाल विचारत पवारांचा इतिहासच खोटं बोलण्याचा आहे, अशी टीका केली आहे.

मोदींच्या भेटीत काय झालं माहिती नाही मात्र जर ऑफर दिली असेल तर एवढे दिवस सांगायला का लागले? असा सवाल चंद्रकांत पाटलांनी पवारांना विचारला आहे. तसेच तुमची परंपरा ही आतापर्यंत खोटं बोलण्याची आहे. मग तुमच्यावर

विश्वास कोण ठेवणार? पळत नाही तुमची धावत जाण्याची परंपरा आहे मग तेव्हा तुम्ही का नाही गेलात? असे अनेक तिखट सवाल चंद्रकांत पाटलांनी पवारांना केले आहेत. शरद पवार कधी काय करतील याचा अंदाज एवढ्या वर्षात राजकारण्यांनाच

काय राज्यातल्या जनतेलाही लागला नाही, त्यामुळे पवारांनी आत्ता टाकलेल्या गुगलीमागील कारण काय? हे येणारा काळच सांगेल, मात्र सध्या तरी यावरून ऐन थंडीच्या दिवसात राजकारण तापलंय.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!