Friday, January 21, 2022

नगर जिल्ह्यातील या बड्या मंत्र्यांला कोरोनाची लागण…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी ट्वीट करत माहिती दिली. आपली कोरोना

चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण पुढील उपचार घेणार आहोत, असे थोरात यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राज्यातील जनतेलाही मास्कचा वापर करण्याचे

आवाहन बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्वीटमध्ये केलं आहे. याआधी राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, सुप्रिया सुळे आणि वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाहीत, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.

माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज 29 डिसेंबर रोजी त्यांच्या टि्वटर हँडलवरून दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले, मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे

 कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!