Tuesday, January 18, 2022

 सर्वात मोठी बातमी: महाराष्ट्रात पुन्हा कठोर निर्बंध ; विवाहसोहळ्यांत ५० जणांना परवानगी ? वाचा संपूर्ण नियमावली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:करोना रुग्णसंख्या वाढल्याने राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. विवाह सोहळय़ांबरोबरच कोणत्याही समारंभात फक्त ५० जणांनाच परवानगी असेल.

तसेच रुग्णसंख्या वाढणाऱ्या जिल्हे किंवा महापालिका हद्दीत निर्बंध कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आले आहेत. मावळत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी मुंबईसह विविध शहरे किंवा पर्यटनस्थळी

चौपाटय़ा किंवा समुद्रकिनाऱ्यांवर होणारी गर्दी लक्षात घेता या सर्व चौपाटय़ा बंद केल्या जाणार आहेत.राज्यात दोन दिवसांत करोना रुग्णसंख्येत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली. शिवाय ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत वाढ होत असून, या विषाणूच्या संसर्गामुळे

एकाचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर निर्बंध लादण्याशिवाय पर्याय नसल्याचे सरकारच्या उच्चपदस्थांचे मत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाविषयक तज्ज्ञ समितीच्या सदस्यांशी सविस्तर चर्चा केल्यावर निर्बंध अधिक कठोर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या संदर्भातील आदेश रात्री उशिरा जारी करण्यात आला. हे सर्व निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून अमलात येतील. सध्या तरी गर्दी कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. अलीकडे राज्यात विवाहसोहळे मोठय़ा दिमाखात आणि गर्दीत साजरे होत आहेत.

त्यातूनच संसर्गाचा अधिक प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे विवाह सोहळय़ांतील गर्दी रोखण्यावर भर देण्यात आला आहे. खुल्या मैदान किंवा बंदिस्त सभागृहातील विवाह सोहळय़ांमध्ये फक्त ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी असेल.

सर्वच राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांत फक्त ५० लोकांनाच सहभागी होण्यास परवानगी असेल. ही संख्या खुल्या किंवा बंदिस्त सभागृहांमधील कार्यक्रमांना लागू असेल.अंतिम विधीसाठी स्मशानभूमीत फक्त २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे.

चौपाटय़ा, पर्यटन क्षेत्रे येथे गर्दी टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास स्थानिक प्रशासनाने चौपाटय़ा, समुद्रकिनारे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.उपाहारगृहांमध्ये सध्या ५० टक्क्यांच्या क्षमतेला परवानगी

असली तरी बहुतांशी उपाहारगृहे भरलेली असतात. उपाहारगृहांची तपासणी करण्याची पुरेशी यंत्रणा पोलिसांकडे नाही. यामुळे यावर निर्बंध आणावेत, असे पोलिसांचे म्हणणे होते. पण यावर काही निर्णय झालेला नाही.करोनाची लाट रोखण्यासाठी अधिक

कठोर निर्बंध किंवा टाळेबंदीचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत. मात्र टाळेबंदी करताना शहर किंवा जिल्हयातील उपलब्ध खाटा आणि प्राणवायूची गरज याचा विचार करून टाळेबंदीचा निर्णय घेताल जाईल. करोनाचा उद्रेक

 वाढल्यास चित्रपटगृहे, मॉल, नाटय़गृह यांच्यावरही निर्बंध लागू करावी लागतील, अशीही चर्चा बैठकीत झाली. शाळा बंद करण्याबाबतही बैठकीत विचार झाला. पण लगेचच शाळा बंद करू नयेत, असा बैठकीतील सूर होता. शाळांमध्ये लसीकरण सुरू करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!