नवासा
नेवासा येथील तीर्थक्षेत्र श्रीसंत ज्ञानेश्वर मंदिर संस्थान मध्ये “पुस्तकाचे गाव नेवासा” ही नवीन संकल्पना राबविण्या करीता संस्थानचा पुढाकार असून ज्ञानेश्वर माऊलींच्या भूमीत पुस्तकाचे गाव व्हावे यासाठीची पुढील कार्यवाही करण्यासाठी राज्य मराठी भाषा विभागाकडे प्रस्ताव पाठवावा अशी मागणी संस्थानचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी
जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचे कडे केली आहे.
संत ज्ञानेश्वर संस्थांनचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दि.१७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी श्री.सालीमठ यांची समक्ष भेट घेऊन”पुस्तकांचे गाव नेवासा” या संकल्पने बाबद सविस्तर चर्चा केली. कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी ज्ञानेश्वरी रचना स्थानाचे महत्त्व, उपलब्ध असलेली इमारत, प्रशस्त लायब्ररी, कर्मचारी वर्ग व शासनमान्य ट्रस्ट इत्यादी सर्व सुविधाबाबत सविस्तर माहिती दिली. हा नवीन संकल्प राबविण्याचा उद्देश उदात्त आहे. वाचन संस्कृती वाढावी, नवीन पिढीला चांगली पुस्तके वाचता यावीत तसेच मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणात अभ्यास व्हावा व नवीन संशोधकांना संदर्भासाठी पुस्तकांचा उपयोग व्हावा यासाठी राबवली जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करू असे आश्वासन दिले.