Thursday, January 20, 2022

उद्या मोदी सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट ? 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर ट्रान्सफर होणार 20000 कोटी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशातील शेतकऱ्यांसाठी खूशखबर आहे. पीएम किसान योजनेच्या 10 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नवीन वर्षात मोदी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे.

ते म्हणजे, 1 जानेवारी 2022 ला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीएम किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता म्हणजेच 2000 रुपये जमा होणार आहे. देशातील एकूण 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजून 30 मिनिटांला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान योजनेचा 10 हप्ता ट्रान्सफर करण्याबाबत घोषणा करणार आहेत.

बहुतांश शेतकरी 10 व्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. आतापर्यंत देशातील नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान सम्मान निधी योजनेचे 9 हप्ते ट्रान्सफर करण्यात आले आहेत. 1 जानेवारी 2022 रोजी

शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये ट्रान्सफर केले जातील, अशी माहिती योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एका संदेशाद्वारे सरकारकडून देण्यात आली आहे.केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार,

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पुढील हप्ता जारी करतील, शेतकरी उत्पादक संघटनांसाठी इक्विटी अनुदान जारी करतील. या कार्यक्रमात तुम्ही pmindiawbcast.nic.in द्वारे सहभागी होऊ शकता.

किंवा दूरदर्शनद्वारेही सहभागी होऊ शकतात.केंद्र सरकारतर्फे शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात वार्षिक 6,000 रुपये थेट आर्थिक सहाय्य म्हणून ट्रान्सफर केले जातात. ही रक्कम 2000-2000 रुपयांच्या हप्त्यांमध्ये दर तिसऱ्या महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवली जाते.

आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 9 हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. आता पुढील म्हणजेच 10 व्या हप्त्याचे पैसे 1 जानेवारीला थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!