Saturday, January 22, 2022

या लशीमुळे लहान मुलांवर दुष्परिणाम ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:ओमिक्रॉनमुळे तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली. त्यामुळे लहान मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवला असून युएसमध्ये फायझरची लस दिली जात आहे. पण, लसीचे ५ ते ११ वयोगटातील

मुलांवर सौम्य दुष्परिणाम जाणवत असल्याचं यू.एस. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालावरून समोर आलं आहे.डेटावरून असे दिसून आले की लसीच्या दुसऱ्या

डोसनंतर काही मुलांनी इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, थकवा आणि डोकेदुखी यासारख्या समस्या जाणवल्या. तसेच ५-११ वयोगटातील ११ मुलांमध्ये मायोकार्डीटीसची समस्या देखील आढळून आली. त्यापैकी सात जण बरे झाले होते आणि चार जणांवर अद्यापही

उपचार सुरू आहेत. एमआरएनए या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली लस घेतल्यानंतर मायोकार्डीटीस होणे हे फार दुर्मिळ आहे. युएसमध्ये ऑक्टोबर महिन्यात ५ ते १५ वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी मिळाली होती.

आतापर्यंत मुलांना फायझरचे ८.७ दशलक्ष डोस देण्यात आले आहेत. त्यानंतर यू.एस. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने अभ्यास करून एक अहवाल तयार केला. यामध्ये असे दिसून आले की, १२-१७ वयोगटातील मुलांमध्ये कोरोनाविरोधात लढण्यासाठी लस ९२ टक्के प्रभावी आहे.

पण, हा अभ्यास करताना युएसमध्ये डेल्टा व्हेरियंटची लाट सुरू होती, असंही अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. भारतात मुलांना कोणती लस? -पंतप्रधान मोदींनी ख्रिसमसच्या दिवशी महत्वाची घोषणा केली. १५-१८ वयोगटातील

 मुलांचे लसीकरण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार १५ ते १८ वयोगटातील मुलांना येत्या ३ जानेवारी २०२२ पासून लसीकरण सुरु होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ लहान मुलांसाठी असलेली कोव्हॅक्सिनची लस देण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!