Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना:लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: मुलाला साधी ठेचही लागली तरी आईचं मन कासावीस होतं. अशात आई आणि मुलाच्या अतूट नात्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील

प्रवरानगर येथे एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती कळताच, आईचा देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.अवघ्या काही तासांच्या अंतराने अशाप्रकारे मायलेकाचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. राजेंद्र दत्तात्रय गागरे

असं अपघातात मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर नलिनी दत्तात्रय गागरे असं हृदयविकाराच्या झटक्याने गतप्राण झालेल्या आईचं नाव आहे. मृत राजेंद्र हा एलआयसी एजंट म्हणून काम करतो, तर त्याची आई या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आहे.

घटनेच्या दिवशी मृत राजेंद्र हा लोणीहून आपल्या घरी दुचाकीने जात होता. दरम्यान राहाता तालुक्यातील लोणी-कोल्हार रस्त्यावरून जात असताना, राजेंद्रच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की राजेंद्रचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, घटनेचा पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. तसेच पोलिसांनी अपघाताची माहिती राजेंद्र यांच्या कुटुंबीयांना कळवली.

मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, आई नलिनी दत्तात्रय गागोरे यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना देखील यश आलं नाही.

मुलाच्या मृत्यूनंतर अवघ्या काही तासांतच आईनं देखील अखेरचा श्वास सोडला आहे. एकाच दिवशी मायलेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने गावात शोककळा पसरली होती. कुटुंबीयांनी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार केले आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!