Saturday, June 10, 2023

भेंडा-सलाबतपुर रस्त्याचे कामासाठी महिला सरपंचांचे रस्तारोको

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

भेंडा/नेवासा

गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या भेंडा गोंडेगाव सलाबतपुर रस्त्याचे काम त्वरित पूर्ण व्हावे या मागणीसाठी भेंडा, गोंडेगाव, नजीक चिंचोली, गोंडेगावच्या महिला सरपंचासह ग्रामस्थांनी नेवासा-शेवगाव रस्त्यावर भेंडा बसस्थानक चौकात सोमवार दि.१७ एप्रिल रोजी सकाळी ९:१५ ते १०:०० या वेळेत रस्तारोको आंदोलन केले.

अनेक चार वर्षा पासून रखडलेल्या भेंडा-गोंडेगाव- सलाबतपुर या रस्त्याचे काम तीन ते चार दिवसात चालु करावे अन्यथा सोमवार दि.१७ एप्रिल २०२३ रोजी भेंडा बुद्रुक बस स्थानक चौकात  भेंडा बुद्रुक, भेंडा खुर्द, गोंडेगांव सौंदाळा, नजिक चिंचोली, सलाबतपुर या पंचक्रोशीतील गावच्या सर्व महिला सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य हे रस्तारोको  आंदोलन व आमरण उपोषण करतील असे निवेदन भेंडा बुद्रुक,भेंडा खुर्द, नजीक चिंचोली, सौंदाळा, गोंडेगावच्या  सरपंचांनी नेवासाचे तहसीलदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांना दिले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने आक्रमक झालेल्या महिला सरपंचांनी भेंडा रस्तारोको आंदोलन केले.

आंदोलनात माजी आमदार पांडुरंग अभंग,काशिनाथ नवले,तुकाराम मिसाळ,अशोकराव मिसाळ, डॉ. शिवाजी शिंदे, गणेश गव्हाणे, हरिभाऊ नवले, बाळासाहेब गव्हाणे, शरद आरगडे,
बाळासाहेब नवले, रामकृष्ण आठरे, अजित मुरकुटे, वैभव नवले, भागचंद चावरे, रमेश गोर्डे, शिवाजी तागड, नामदेव निकम, बलभीम फुलारी, रामचंद्र गंगावणे, सचिन तागड, दादा गजरे,गुलाबराव आढगळे, बाळासाहेब वाघडकर, वामनराव मापारी, ज्ञानेश्वरच्या संचालिका सौ. रत्नमाला नवले,सौ.लताबाई मिसाळ, सौ मीरा नवले,सौ. वैशाली शिंदे, सौ. रोहिणी निकम,उपसरपंच मंगल गोर्डे,सौ. शिलाबाई नवले,सौ.राणी आरगडे, सौ.मनीषा आरगडे,सौ. सविता आरगडे,सौ. नवसाबाई गजरे,सौ. माया गंगावणे,सौ. कलाबाई वायकर, नजीक चिंचोलीच्या सरपंच सौ.वनमाला चावरे, सौंदाळाच्या सरपंच सौ.प्रियंका आरगडे, गोंडेगाव-पिचडगावच्या  सरपंच सौ.कविता शिरसाठ, बाभूळखेड्याच्या सरपंच सौ.अश्विनी औताडे आदि सहभागी झाले होते.

माजी आमदार पांडुरंग अभंग,जेष्ठ नेते काशिनाथ नवले,भेंडा बुद्रुकच्या सरपंच सौ.उषा मिसाळ,
सौ.श्रद्धा आरगडे,भेंडा खुर्दच्या सरपंच सौ.वर्षा नवले, संतराम रोडगे,डॉ.संतोष फुलारी,अजित मुरकुटे,प्रभाकर कोलते, बाळासाहेब झावरे, सौ.पुष्पा नवले, सौ. संगीता गव्हाणे,बाबासाहेब रोडगे यांची भाषणे झाली. भेंडा-गोंडेगांव-सलाबतपुर रस्त्याला मंजूरी मिळून ४ वर्षे पूर्ण झाली आहेत. वर्कऑर्डरही मिळालेली आहे. फक्त कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाई व बेजबाबदार पणामुळे आजपर्यंत हे काम पूर्ण झालेले नाही. जो रस्ता झाला आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे,या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या गरोदर महिला, वृद्ध, शालेय विद्यार्थी यांना त्रास होत आहे. अनेक वेळा अपघात होत आहेत,ग्रामस्थाना अनेक अडचणीत सामोर जावे लागत असल्याचा आरोप वक्त्यानी केला.

*ठेकेदाराला काळ्या यादी टाका-अभंग*

यावेळी बोलतांना माजी आमदार पांडुरंग अभंग म्हणाले की, भेंडा-सलाबतपूर रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था आहे. महिलांनी पुढाकार घेऊन केलेले हे आंदोलन आहे. लोकांना सामाजिक प्रश्नाचे तीव्रता नाही. त्यामुळे प्रश्न रखडत आहेत. सामुदायीक कामासाठी मतभेद विसरून सर्वांनी एकत्र आले तरच शासनाला जाग येईल. कांदा अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्यात कराव्या. सार्वजनिक कामे दर्जेदार होतील यासाठी सर्वांनीच दक्ष राहिले पाहिजे. हा रस्ता आणि ज्ञानेश्वर मंदिराचे काम अर्धवट सोडणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले पाहिजे.

*सरपंच सौ.उषा मिसाळ..*

भेंडा बुद्रुकच्या सरपंच सौ.उषा मिसाळ यांनी,पुरोगामी महाराष्ट्रात रस्त्यासाठी महिलांना उपोषणाची वेळ का यावी ? असा प्रश्न उपस्थित करून कांदा अनुदानासाठी ई-पिक नोंदणी अटरद्द करून तलठ्यांच्या हस्तलिखित नोंदी ग्राह्य धराव्यात,अतिवृष्टि पिक नुकसान भरपाई व पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरीत वर्ग करा अशी मागणी.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरेश दुबाळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारुन संबंधित ठेकेदारास लवकरात लवकर काम पूर्ण करण्याबाबद आदेशित करण्यात आले असून लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्याने रस्तारोको आंदोलन व नियोजित आमरण उपोषण मागे घेण्यात आले.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!