Tuesday, January 18, 2022

दोन लहान मुलींसह बेपत्ता महिलेस शोधण्यात नेवासा पोलिसांना यश

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

तालुक्यातील चिलेखनवाडी येथून दोन लहान मुलींसह बेपत्ता असलेल्या महिलेला शोधण्यात नेवासा पोलिसांना यश मिळाले आहे.

तालुक्यातील चिलेखनवाडी येथील महिला शितल विठ्ठल बोरुडे (वय 30 वर्षे) रा. बोधेगांव ता. शेवगांव ह.मु चिलेखनवाडी ता. नेवासा जि. अहमदनगर ही तिच्या मुली राजश्री विठ्ठल बोरुडे (वय 10 वर्ष)  तन्वी विठ्ठल बोरुडे (वय 07 वर्षे) दोघी रा. बोधेगांव ता. शेवगांव हमु चिलेखनवाडी ता नेवासा या दि. 15 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 10.30 वाजे पासून बेपत्ता होत्या.महिलेचे वडिल बाप्पु रामा निकाळजे (वय 55 वर्षे) व्यवसाय मजुरी रा. चिलेखनवाडी ता. नेवासा यांनी दि.22 डिसेंबर 2021नेवासा पोलीस ठाण्यात खबर दिली होती.त्यानुसार नेवासा पोलिस ठाण्यात रजिस्टर न. 103 /21 नुसार मिसिंग दाखल होती.
पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात यांचे पथकाने कसोशीने शोध घेतला असता दि.31 डिसेंबर रोजी सदर महिला व तिच्या दोन मुली नेवासा तालुक्यातील गेवराई येथे सुखरुप मिळुन आलेले आहेत.
सदर महिलेने स्वखुशीने दुसरा विवाह केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी दिली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!