Monday, January 17, 2022

शेतकऱ्यांसाठी नवीन वर्ष आनंदाची बातमी, मोदी सरकारने ट्रान्सफर केली 20000 कोटींपेक्षाही जास्त रक्कम

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना नवीन वर्षाची भेट देत PM शेतकरी सन्मान निधी योजनेचा 10 वा हप्ता आज जारी केला आहे. या हप्त्यात सरकारने 10 कोटी शेतकऱ्यांना 20 हजार कोटींहून अधिक रक्कम हस्तांतरित केली आहे.

यासोबतच पंतप्रधानांनी सुमारे 351 शेतकरी उत्पादक संस्थांना 14 कोटींहून अधिक इक्विटी अनुदान जारी केले आहे, यामुळे 1.24 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तुम्ही देखील या योजनेचे लाभार्थी असाल तर लवकरात लवकर तुम्हाला हे पैसे मिळाले की नाही हे तपासा.

केंद्र सरकार पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 2000 रुपये पाठवते. आतापर्यंत या योजनेचे दहा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचं

उत्पन्न वाढवणं हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे. ही योजना 2019 मध्ये मोदी सरकारने सुरू केली होती. कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दर वर्षी 6000 रुपये तीन हप्त्यांमध्ये पाठवले जातात.

या योजनेअंतर्गत वर्षातील पहिला हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै, दुसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च दरम्यान पाठवला जातो. प्रत्येकी दोन हजार रुपयांचा हप्ता असतो. छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर आहे.

पैसे न मिळाल्यास या क्रमांकावर करा तक्रार

पीएम किसान टोल फ्री नंबर: 18001155266

पीएम किसान हेल्पलाइन नंबर:155261

पीएम किसान लँडलाइन नंबर्स: 011—23381092, 23382401

पीएम किसानची नवी हेल्पलाइन: 011-24300606

पीएम किसान आणखी एक हेल्पलाइन आहे: 0120-6025109

ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!