Tuesday, January 18, 2022

सरकारकडून मिळेल मदत:दरमहा होईल लाखोंची कमाई! नवीन वर्षात सुरू करा हा व्यवसाय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:नवीन वर्षात नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुमचा विचार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही पेपर नॅपकिन बिझनेसचा विचार करू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला सरकारकडून देखील मदत मिळेल.

पेपर नॅपकिन मॅन्यूफॅक्चरिंग यूनिट सुरू करून तुम्ही दरमहा बंपर कमाई करू शकता. पेपर नॅपकिनचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करण्यासाठी किती खर्च येतो आणि त्यातून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई कशी करू शकता याबद्दल जाणून घेऊया.

जर तुम्ही टिश्यू पेपर किंवा पेपर नॅपकिन बनवण्याचे यूनिट सुरू करणार असाल तर तुम्हाला 3.50 लाख रुपयांची व्यवस्था करावी लागेल. एवढे पैसे असल्यास तुम्ही कोणत्याही बँखेच्या मुद्रा स्कीमअंतर्गत कर्जासाठी अर्ज करू शकता.

3.50 लाख रुपये तुमच्याकडे असल्याने बँकेकडून तुम्हाला टर्म लोन स्वरुपात 3.10 लाख रुपये आणि वर्किंग कॅपिटल लोन 5.30 लाख रुपयांपर्यंत मिळेल.वर्षभरात 1.50 लाख किलो पेपर नॅपकिनचे उत्पादन केले जाऊ शकते.

हे पेपर नॅपकिन्स तुम्ही साधारण 65 रुपये प्रति किलोच्या दराने विकू शकता. अर्थात वर्षभरात तुम्हाला 97.50 लाख रुपयांचा टर्न ओव्हर शक्य आहे. तुम्ही संपूर्ण खर्च वजा केल्यास 10-12 लाख रुपयांची वार्षिक बचत होईल.

तुम्ही हा व्यवसाय करण्यास इच्छूक असाल तर पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत कोणत्याही बँकेत या व्यवसायासाठी कर्ज मिळावं म्हणून अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला अर्जात नाव पत्ता, व्यवसायाच्या ठिकाणचा पत्ता आणि इतर माहिती द्यावी लागेल.

इथं तुम्हाला प्रोसेसिंग किंवा गॅरंटी फी द्यावी लागणार नाही. कर्ज तुम्ही हप्त्यांत फेडू शकता.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!