Friday, January 21, 2022

“ज्ञानेश्वर”चे एमडी अनिल शेवाळे यांना उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

साखर उद्योगातील शिखर संस्था असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे (व्हिएसआय) सन 2020-21 गळीत हंगामासाठीचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांना उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार जाहीर झाला आहे.रोख 10 हजार रुपये ,मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन लवकरच व्हिएसआयचे अध्यक्ष खा.शरद पवार यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

श्री.शेवाळे हे 8 डिसेंबर 2000 रोजी भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात चीफ केमिस्ट पदावर रुजू झाले.त्यानंतर 1 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी कार्यकारी संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला.आज तागायत ते कार्यकारी संचालक पदावर कार्यरत आहे.लोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सर्वप्रथम 12 मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी,माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली 19.5 मेगावॅटचा दुसच्या सहवीज निर्मिती प्रकल्पाची यशस्वी उभारणी,कारखाना गाळप क्षमतेत वाढ,डिस्टिलरी प्रकल्पाचे आधुनिकीकरण,इथेनॉल प्रकल्प उभारणी आदी प्रकल्प-योजना यशस्वी रित्या पूर्ण करून त्या कार्यान्वित करण्यात श्री.शेवाळे यांचे मोठे योगदान आहे.यापूर्वी त्यांना भारतीय साखर संस्थेचा उत्कृष्ठ कार्यकारी संचालक पुरस्कार ही प्राप्त झालेला आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी श्री.शेवाळे यांचे अभिनंदन केले. ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे वतीने कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक काकासाहेब नरवडे, काशिनाथ नवले,शिवाजीराव कोलते,अशोकराव मिसाळ,दादासाहेब गंडाळ,कामगार संचालक सुखदेव फुलारी,सचिव रवींद्र मोटे,तांत्रीक सल्लागार एम.एस.मुरकुटे,एस.डी. चौधरी,महेंद्र पवार,आप्पासाहेब खरड,शेंडगे,चीफ अकाउंटंट रामनाथ गरड,शेतकी अधिकारी सुरेश आहेर,जनसंपर्क अधिकारी कल्याण म्हस्के,विलास लोखंडे,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे,विनोद गाडगे,संभाजीराव माळवदे,डॉ.शिवाजीराव शिंदे,डॉ.अशोकराव ढगे,बापूसाहेब नजन आदी उपस्थित होते.

*प्रतिक्रिया*
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील साहेबांनी 2000 साली माझी चीफ केमिस्टपदी निवड करून मला ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यात काम करण्याची संधी दिली.माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी 2007 साली कार्यकारी संचालक पदावर संधी दिली.स्वर्गीय मालकांचे आशीर्वाद, माजी आमदार नरेंद्र घुले पाटील साहेब,माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,माजी आमदार पांडुरंग अभंग साहेब,जेष्ठ संचालक अड.देसाई देशमुख यांचे सहकार्याने मी पुरस्कारापर्यंत पोहचू शकलो.हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून ज्ञानेश्वर उद्योग समूहातील प्रत्येक घटकांचा आहे.
*अनिल पं.शेवाळे*
कार्यकारी संचालक,लोकनेते मारुतराव घुले पाटील
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!