Thursday, January 20, 2022

लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ द्यायचं नसेल तर या चुका टाळा

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लग्नानंतर नवरा बायकोचे  नाते फुलणे फार महत्वाचे असते. तुमचे शारिरिक सबंध जर अतिशय चांगले आणि ग्रेसफुल असतील तर दोघांमधले नाते अधिक बहरते.

दोघांना एकमेकांची ओढ लागते. या परिपक्व शारीरिक सबंधामुळेच (Sex) दोघांचे वैवाहिक आयुष्यही चांगले जाते. अनेक कपल्स एकमेकांच्या गरजा सांभाळून हे नाते सुदृढ करण्याचा फार छान प्रयत्न करतात. पण काहींना ते जमतेच असे नाही.

यामुळे असंतोष निर्माण होऊ शकतो. तुमच्या नात्यात लैंगिक संबंधांची कमतरता असेल तर अनेक समस्या येऊ शकतात. तुमच्या काही सवयीही तुमच्या दोघांमधले अंतर वाढविण्यात कारणीभूत ठरू शकतात. तुम्हाला जर या 8 सवयी असतील तर लग्नानंतरच सेक्स लाईफ उद्ध्वस्त होऊ शकतं

१) आळस :लैगिक संबंधात ऊर्जा, पुढाकार घेणे आणि कधीकधी योग्य नियोजन आवश्यक असते. नवरा बायकोने ते घडवून आणण्यासाठी खूप प्रयत्न केले पाहिजेत. पण जर तुम्ही आळस करत असाल,

सारखे थकलेले असाल तर मग समोरच्या पार्टनरला त्याचा त्रास होऊ शकतो. अशाने तो नाराज होऊ शकतो. आळस हा मोठा शत्रू आहे. म्हणून आळस दूर सारून खुल्या मनाने दोघे एकत्र या.

२) असंतुष्टता काही काळानंतर तुम्हाला लैगिक संबंधांचा अंदाज येऊ शकतो. यातही तेच तेच करण्याची सवय लागणे सोपे आहे. पण स्त्रियांना लैंगिक संबंधांबद्दल दबाव जाणवू शकतो. कारण फक्त कृती नको असते तर त्यात आपलेपणा हवा असतो. तो देण्यासाठी काही वेगळे पर्याय आत्मसात करा.

३) शरीराची काळजी घ्या :रोजचा व्यायाम आणि हेल्दी खाण्याबरोबरच तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यावी. दोघांनीही वर्षातून किमान एकदा डॉक्टरकडे जाऊन आरोग्य आणि ताणतणावाचे स्तर तपासावेत. यामुळे तुम्हाला काही शारीरिक,

मानसिक त्रास असेल तर ते समजून घेता येतात. त्यावर उपाय करून तुमचे शारीरिक संबंध बिघडले असल्यास पुन्हा पूर्ववत करता येऊ शकतात.

४) संवादाचा अभाव घट्ट भावनिक नाते असेल तर तुमचे शारीरिक संबंधही उत्तम होतात. अशासाठी संवाद साधणे गरजेचे आहे. उत्तम सेक्सची सुरुवात भावनिक जोडणीने होते. महिलांसाठी, भावनिक संबंध फार गरजेचे असतात. त्यामुळे त्या लैंगिक संबंधात उत्तम सहकार्य करू शकताता. जेव्हा

दोघांमधला संवाद संपायला लागतो तेव्हा विवाहास त्रास होतो. त्यामुळे सतत आपल्या गरजांविषयी, आवडीनिवडीविषयी, शारीरिक संबंधांच्या गरजांविषयी बोलत राहणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!