Tuesday, January 18, 2022

नगर जिल्ह्याच्या शेजारीच धक्कादायक प्रकार ;16 वर्षांच्या मुलाला covaxin ऐवजी दिली covishield लस मग काय…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आजपासून म्हणजेच 3 जानेवारीपासून देशात 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आजपासून या वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 1 जानेवारीपासून कोविन अॅप आणि पोर्टलवर या लसीकरणासाठी नोंदणी सुरु झालं. या लहान मुलांच्या लसीकरणासाठी नाव नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचं समजतंय.

कोरोनावर मात करण्यासाठी आजपासून देशभरात 15 वर्षांपर्यंतच्या मुलाला कोरोनाची लस दिली जात आहे. या लहान मुलांना कोव्हॅक्सिनची लस देण्याचे जाहीर झाले आहे. दरम्यान

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात एका 16 वर्षीय मुलाला कोव्हॅक्सिन ऐवजी कोविडशिल्ड लस देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.येवला तालुक्यातील  पाटोदा आरोग्य केंद्रात हा प्रकार समोर आला आहे. आजपासून

15 ते 18 वयोगटातील मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले असून  शासनाने या मुलांना कोव्हॅक्सिन लस देण्याचे निर्देश दिले आहे.  मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात 16 वर्षीय विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी चक्क कोविशील्ड

लस देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून येवला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत.या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी सदर मुलाच्या वडिलांनी केली आहे.

तर आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सेविकेकडून चुकून हा प्रकार झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!