Saturday, January 22, 2022

किसान सन्मान योजना:10 वा हप्ता मिळाला पण 11वा हप्ता मिळणार नाही ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पीएम किसान सम्मान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे आवश्‍यक असून ई-केवायसी नसेल तर पुढचा म्हणजेच एप्रिलमध्ये मिळणारा दोन हजारांचा

अकरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यासाठी 31 मार्चच्या आत सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करावी.शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दरवर्षी तीन हप्त्यात सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली होती.

त्याची अंमलबजावणी नियमितपणे सुरू आहे. नुकताच 1 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दहाव्या हप्त्याचे वाटप करण्यात आले. देशभरातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ देण्यात येत आहे. परंतु यात काही गैरप्रकार समोर येत असल्याने

आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे. खरे तर दहावा हप्ता मिळण्यापूर्वीच याची चर्चा होती; परंतु यात सवलत देण्यात आली. मात्र, आता ई-केवायसीशिवाय अकरावा हप्ता मिळणार नाही, हे निश्‍चित झाले आहे.

शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी स्वत:च्या मोबाईलवर ओटीपी किंवा सीएससी सेंटरवर बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पीएम किसान App द्वारे (PM Kisan App) लाभार्थ्यांना स्वत: ई-केवायसी मोफत करता येईल.

सीएससी केंद्रावर मात्र पंधरा रुपये शुल्क निश्‍चित करण्यात आले आहे. ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवासी विशेष जनजागृती मोहीम राबवून 31 मार्चच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे म्हटले आहे.

नियम स्पष्ट असतानाही अपात्रांनी घेतला लाभतळागाळातील शेतकऱ्याला पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळावा, ही केंद्र सरकारची भूमिका होती. मात्र, आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येणार नसल्याचे त्याचवेळी स्पष्ट करण्यात आले होते.

असे असतानाही नियम डावलून योजनेचा लाभ घेणाऱ्यांमध्ये अशाच शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शिवाय अनधिकृतपणे योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची यादी, फोन नंबर हे ग्रामपंचायत कार्यालय येथे लावण्यात आले होते. एवढेच नाही

तर त्यांनी लाभ घेतलेली रक्कम महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यानुसार अनेक अपात्र शेतकऱ्यांनी पैसे परत केले आहेत. त्यांना आता दहाव्या हप्त्याचा लाभ मिळाला नाही. या योजनेत अधिक पारदर्शकता राहण्यासाठी आता ई-केवायसीचा पर्याय पुढे आला आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!