Tuesday, January 18, 2022

अत्यंत महत्त्वाचे:वेळेत पूर्वसूचना दाखल करा तरच मिळणार नुकसानभरपाई ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पीक नुकसानीचा गाजावाजा मोठ्या प्रमाणात होतो पण नुकसानभरपाईसाठी आवश्यक असलेली प्रक्रियाच पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. शिवाय ती योग्य वेळेत पूर्ण न केल्याने अनेक शेतकरी हे मदतीपासून वंचित राहतात.

आता खरीप हंगामानंतर रब्बी हंगामातील पिकांचेही अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे.नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी वेळेत पूर्वसूचना दाखल केल्यातरच ही भरपाई मिळणार असल्याचे कृषी संचालकांनी स्पष्ट केले आहे.

शिवाय राज्यातील 6 विमा कंपन्या आणि जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयांना पत्र पाठवून याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची कल्पना संबंधित विभागाला दिल्यास मदत मिळण्यास

काही अडचण उद्भवणार नाही. त्याअनुशंगाने सहा पर्याय शेतकऱ्यांसमोर खुले करण्यात आले आहेत. यामध्ये क्रॅाप इन्शुरन्स अॅप या Crop Insurance https#//play.google.com/store/apps/details ? लिंकवर मिळणार आहे. हे ॲप फोनमध्ये Install करुन समोर

येणाऱ्या सूचनांद्वारे आपली योग्य माहिती भरावी लागणार आहे. विमा कंपनीच्या 1800 2660 700 या टोल फ्री क्रमांकावर पूर्वसूचना देता येणार आहे. विमा कंपनीच्या pmfby.gov.in या ई-मेलवर देखील सूचना करता येणार आहे. तसेच विमा कंपनीचे

तालुकास्तरीय कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखेमध्येही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.केवळ माहिती नसल्याने अनेक शेतकरी हे नुकसानभपाईपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे पीक नुकसानीच्या पूर्वसूचना दाखल

करण्याबाबत गावोगावात जनजागृती होणे गरजेचे आहे. शिवाय सोशल मिडीयाचा वापर करुनही याबाबत योग्य तो संदेश शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. नुकसानीनंतर अवघ्या 72 तासाच्या आतमध्ये ही प्रक्रीया

पूर्ण केली तरच मदत मिळते. मात्र, शेतकरी याबाबत अनभिज्ञ राहतात व पुन्हा भरपाई मिळाली नसल्याच्या तक्रारी वाढतात.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!