Saturday, January 22, 2022

धक्कादायक घटना:नगर जिल्ह्यातील प्रेमी युगुलाची कोल्हापुरात आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:अहमदनगर जिल्ह्यातील प्रेमी युगुलाने कोल्हापुरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधांना विरोध केल्याने त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे.

विशेष म्हणजे तरुणीचं लग्न झालं असून तिला मुलगाही असल्याची माहिती आहे. राहुल मच्छे आणि प्रियंका भराडे अशी आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाची नावं आहेत.
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराजवळ एका धर्मशाळेत दोघांनी

गळफास घेऊन आयुष्याची अखेर केली. दोघांच्या मृतदेहाजवळ चिठ्ठी सापडल्यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. दोघांच्या आत्महत्येमुळे प्रियकर, विवाहित प्रेयसी, तिचा पती आणि मुलगा अशी चौघांची आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं बोललं जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील तामसवाडी भागात राहणारं प्रेमी युगुल 31 डिसेंबरला कोल्हापुरात आलं होतं. कोल्हापुरात देव दर्शनासाठी आलो असून दोन दिवस राहणार असल्याचं त्यांनी धर्मशाळेच्या व्यवस्थापकांना दिल्याचं वृत्त ‘मुंबई तक’ वेबसाईटने दिलं आहे.

दोन दिवस उलटल्यानंतरही दोघं रुमबाहेरच आले नसल्याने 3 डिसेंबरला व्यवस्थापकांनी दोघं राहत असलेल्या रुमचे दार ठोठावले. पण बराच वेळ प्रतिसाद न आल्यामुळे त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ

धर्मशाळेत धाव घेत खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी दोघंही गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तर बेडवर एक सुसाईड नोट सापडली.राहुल मच्छे आणि प्रियांका भराडे हे दोघेही एकाच गावात राहत होते. गेल्या चार वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध होते.

मात्र प्रियांकाचा विवाह तीन वर्षांपूर्वी गावातीलत एका तरुणासोबत तिच्या कुटुंबीयांनी मनाविरुद्ध लावून दिला. प्रियांकाला एक वर्षांचा मुलगाही आहे. त्यानंतरही दोघांचे प्रेमसंबंध सुरुच होते. अखेर नगरहून थेट कोल्हापूर गाठून दोघांनी आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!