Monday, January 17, 2022

नको तेच :ओमिक्रॉननंतर आढळला नवा व्हेरियंट…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मोठ्या प्रमाणावर म्युटेट होणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरियंटनं जगात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. भारतात या व्हेरियंटमुळं तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे.

पण संशोधकांना आता ओमिक्रॉनपेक्षा अधिक वेगानं म्युटेट होणारा व्हेरियंट आढळून आला आहे. त्यामुळं जगाच्या चिंतेत भर पडली आहे.IHU (B.1.640.2) असं या व्हेरियंटचं नाव असून IHU मेडिटेरनी इन्फेक्शन

इन्स्टिट्यूटनं याचा शोध लागला. संशोधकांचं म्हणणं आहे की, या नव्या व्हेरियंटमध्ये ४६ म्युटेशन्स आहेत, जे ओमिक्रॉनपेक्षा अधिक आहेत. अधिक म्युटेशन्स असलेला हा IHU व्हेरियंट कोरोना प्रतिबंध लसींना अधिक

प्रतिरोध करतो तसेच तो अधिक संसर्गजन्यही आहे, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.संशोधकांना फ्रान्समधील मार्सेलेस येथे IHU व्हेरियंटचे १२ रुग्ण आढळून आले आहेत. अफ्रिकन देश कॅमेरुन

येथील प्रवासाशी संबंधीत ही प्रकरणं आहेत. दरम्यान, असं असलं तरी सध्या ओमिक्रॉननं संपूर्ण जगभरात आपला प्रभाव टाकला आहे. पण आता IHU हा व्हेरियंट वेगानं पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पण अद्याप B.1.640.2 इतर देशांमध्ये

आढळून आलेला नाही किंवा जागतिक आरोग्य संघटनेने अद्याप याचा तपास सुरु असल्याचं कुठलंही शिक्कामोर्तब केलेलं नाही.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!