Thursday, January 20, 2022

या तारखेपासून महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज :मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडली होती. किमान तापमानाचा 10 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्यानंतर, आता राज्यात पुन्हा किमान

तापमानात किचिंत वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस राज्यात थंडी कायम राहणार आहे. पण त्यानंतर राज्यातील किमान तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता हवामान

विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तसेच उत्तर भारतात देखील पुढील सात दिवस थंडीची लाट येणार नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.महाराष्ट्रात मात्र 6 ते 8 जानेवारी दरम्यान अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह

जोरदार पाऊस कोसळणार आहे. 6 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रात तर 7 जानेवारी रोजी उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार आहे. या दोन दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

तर शनिवारी 8 जानेवारीला मात्र विदर्भासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. 8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, अमरावती, नागपूर, अकोला आणि वर्धा या पाच

जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.सध्या वायव्य आणि मध्य भारतावर 2 सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्सेस तयार झाले आहेत.

त्यामुळे 9 जानेवारीपर्यंत वायव्य आणि मध्य भारतात अनेक ठिकाणी जोरदार पावसासह बर्फवृष्टीची शक्यता आहे. 07 जानेवारीला पंजाब,पूर्व-उत्तर प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तर 7 आणि 8 जानेवारीला पूर्व मध्य प्रदेशात गारपिटीसह

मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय पुढील 6-7 दिवस उत्तर भारतात थंडीची लाट येण्याची शक्यता नसल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!