Thursday, January 20, 2022

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ‘इतके’ लाख बाधित होतील ?

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेही उपस्थित होते. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक नियम लागू करण्याचा

निर्णय या आढावा बैठकीत घेण्यात आला. आम्हाला टोकाचं कुठलं पाऊल उचलायला लावू नका असा सूचक इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना दिला आहे.
राज्यासाठीचे नवे निर्बंध उद्या सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण राज्यासंदर्भात उद्या सकाळी ९ वाजता उपमुख्यमंत्री कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जी चर्चा होईल त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने निर्णय होणार आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेत २० लाख लोकं बाधित झाली,

दुसऱ्या लाटेत ४० लाख लोकं कोरोनाच्या विळख्यात सापडली आणि जर जानेवारी अखेरीस किंवा फेब्रुवारीत तिसरी लाट आली तर ८० लाख लोकं बाधित होण्याची शक्यता आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.

अशा परिस्थितीत केंद्र सरकारने अतिरिक्त मनुष्यबळ आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीची केंद्राने उपलब्धता करुन द्यावी अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!