Monday, January 17, 2022

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कापसाच्या भावाचा उच्चांक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कापसाचा भाव वाढत असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून येत होत्या, मात्र यात काही अफवाही होत्या, मात्र मध्य प्रदेशातील कापसाची बाजारपेठ असलेल्या खरगोन, सेंधवा येथे कापसाच्या दराने उच्चांक गाठला आहे.

नवीन वर्षी १ जानेवारी २०२२ रोजी येथे कापसाला प्रति क्विंटल १० हजाराच्या वर दर देण्यात आला. कापसाच्या भावाच्या बाबतीत हा उच्चांक मानला जात आहे.
मात्र तरीही महाराष्ट्रात स्थानिक ठिकाणी काही व्यापारी अजूनही शेतकऱ्यांची

गळचेपी करत आहेत, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ८ हजार ५०० रुपयांच्या वर भाव देत नसल्याचं दिसून येत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चांगल्या प्रतिच्या कापसाला १० हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मध्य प्रदेशात दिला जात आहे.

एकीकडे कापसाला खूप चांगला भाव आहे, असं म्हटलं जात असलं, तरी शेतकऱ्यांकडे असलेल्या कापसाचं प्रमाण कमी आहे. बहुतांश शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस पडून असला, तरी त्याचं प्रमाण इतर वर्षाप्रमाणे नसल्याचं दिसून आलं आहे.

जागतिक बाजारपेठेत कोरोनानंतर पुन्हा कापसाला मागणी वाढली आहे, तेवढ्या प्रमाणात कापूस उपलब्ध नाही, यामुळे कापसाचे दर वाढले आहेत. सतत कापसाची मागणी वाढत असल्याने कापसाचे भाव वाढत आहेत

यावेळी कापसाचा भाव ८ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला असला तरी, दर वर्षी तो ५ ते ५ हजार ५०० रुपयांपर्यंत जात होता.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!