Saturday, January 22, 2022

धक्कादायक:त्या डॉक्टरने महिलांना दिला धोका, तब्बल 14 वेळा वापरलं स्वत:चं स्पर्म

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:जे लोक कधीच नैसर्गिरित्या आई-बाबा बनू शकत नाहीत, ते बहुतेक वेळा फर्टिलिटी सेंटर कडे वळतात. मुलांच्या हसण्या-रडण्याचा आवाज त्यांच्या घरातही गुंजेल अशी त्यांनाही आशा असते. बर्‍याच लोकांसाठी फर्टिलिटी क्‍लीनिक

 हा एक आशेचा किरण आहे. त्यामुळेच अनेक जण मोठ्या आशेने डॉक्टरांकडे जातात. पण एक डॉक्टरने असं काही केलं आहे की ज्यामुळे या सगळ्याच प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

एक डॉक्टर हा त्याच्या फर्टिलिटी क्‍लिनिकमध्ये येणाऱ्या महिलांना स्वत:चे स्पर्म वापरायचं ज्यामुळे अनेक महिला या गर्भवती देखील राहिल्या होत्या. या सगळ्यातील धक्कादायक बाब म्हणजे यापैकी एकाही दाम्पत्याला त्याने आपण असं काही करत आहोत याची माहितीच दिली नव्हती.

पॉल जोन्स असे या डॉक्टरचे नाव आहे. डॉ. पॉल हा अनेक दिवसांपासून अशाच प्रकारे आपलं क्लिनिक चालवत होता. मात्र अखेर त्याच्या कृत्याचा पर्दाफाश झालाच. त्याच्या या कृत्याची चक्क एका टीव्ही शोमध्ये पोलखोल झाली.

डेली स्टारच्या वृत्तानुसार, या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा माइया सिमन्स आणि ताहनी स्कॉट या दोन बहिणींनी केला आहे. या सर्व गोष्टी त्यांनी The Truth About My Conception या न्यूज प्रोगाममध्ये जाहीर केल्या आहेत.

वास्तविक, या दोन्ही मुलींचे वडील जॉन इमॉन्स हे टेस्टिक्युलर कॅन्सरशी झुंज देत होते. याचा अर्थ जॉन आणि त्याची पत्नी चेरिल एमन्स यांना नैसर्गिकरित्या मुले होऊ शकत नव्हती. 1980 आणि 1985 साली ते आरोपी डॉ. पॉलच्या अमेरिकेतील

वेस्टर्न कॉलेरेडो क्लिनिकमध्ये गेले होते. डॉ. पाल याने यावेळी चेरिलला न सांगता स्वतःचे शुक्राणू हस्तांतरित केले.2018 मध्ये Ancestry.com वर कोणीतरी त्याच्याशी संपर्क साधला. Ancestry.com ही एक वेबसाइट आहे जिथे लोक एकमेकांशी संवाद साधतात.

यामध्ये लोक त्यांच्या पिढीचा आणि पूर्वजांचाही शोध घेतात. या वेबसाइटवर प्रत्येकजण मेसेज पाठवून एकमेकांशी बोलू शकतो. ज्यामध्ये ते जनुकशास्त्राच्या आधारे एकमेकांना शोधतात. याच वेबसाइटच्या माध्यमातून माइया हिला एक मेसेज मिळाला.

मेसेजमध्ये लिहिले होते की, ‘आम्ही भाऊ-बहीण आहोत असे वाटते. माझे वडील कोलरडोमध्ये स्पर्म डोनर आहेत. मला माझ्यासारखी दिसणारी आणखी 3 भावंडं सापडली आहेत.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!