Tuesday, January 18, 2022

कोरोनाच्या रुग्णांमध्ये आज मोठी वाढ तर ओमायक्रॉनाचे इतके रुग्ण

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात करोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर

आता कराज्यात पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये तर पहिली ते आठवीपर्यंतच्या ऑफलाईन शाळा देखील ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

 रूग्ण संख्या अशीच वाढत राहिल्यास पुन्हा एकदा लॉकडाउन लावाण्याची वेळ येते की काय अशी देखील भीती आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात १८ हजार ४६६ नवीन करोनाबाधित आढळले असून, ओमायक्रॉनच्या ७५ रूग्णांची नोंद झाली आहे.

याशिवाय २० करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचे देखील समोर आले आहे.तसेच, आज राज्यात ४ हजार ५५८ रुग्ण करोनामुक्त देखील झाले आहेत. यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ६५,१८,९१६ करोनाबाधित

रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे.राज्यात आज रोजी एकूण ६६,३०८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६७,३०,४९४ झाली आहे.

राज्यात आजपर्यंत १४१५७३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ टक्के एवढा आहे.आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,९५,०९,२६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६७,३०,४९४ (९.६८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,९८,३९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १११० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.आज राज्यात ७५ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!