Friday, January 21, 2022

नगर ब्रेकिंग: कॉलेज तरुणीची पुलावरून नदीत उडी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील नगर-मनमाड महामार्गावरील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावरून एका कॉलेज युवतीने उडी मारली. ही खळबळजनक घटना आज, मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.

पोलिस प्रशासन व पालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी व मच्छीमार या तरुणीचा मागील दोन तासांपासून शोध घेत आहेत.मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास गोदावरी नदीवरील मोठ्या पुलावर आपली बॅग बाजूला ठेऊन एका तरुणीने नदीत उडी घेतली आहे.

या मुलीने उडी घेत असताना या महामार्गावरून त्यावेळी दुचाकीवरून जात असलेला सर्पमित्र संदीप खिरे या तरुणाने बघितले, व तात्काळ याबाबत पोलिसांना कळविले. कोपरगाव शहर पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

नदीपात्रात पोलिस कर्मचारी व प्रत्यक्षदर्शी खिरे यांनी या तरुणीचा शोध घेतला. मात्र दुपारी चार वाजेपर्यंत शोध घेऊनही तिचा शोध लागला नाही. त्यानंतर स्थानिक पोहणाऱ्या व मच्छिमार करणाऱ्या नागरिकांच्या साहाय्याने पोलिस निरीक्षक वासुदेव देसले

यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव नगर पालिकेच्या अग्निशमन दलाचे मदन निंदाने, कार्तिक मालकर, चेतन गव्हाणे,घनधाम कुर्हे आदींसह पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी मुलीचा शोध घेत आहे.

घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे. या तरुणीने नदीत उडी मारण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!