Saturday, January 22, 2022

रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्याचं मोठं विधान म्हणाले..

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या त्रासामुळे काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी उद्धव ठाकरे यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला असून यामुळे ते घऱातूनच काम करत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव हिवाळी अधिवेशन नागपुरात न घेता मुंबईत घेण्यात आलं. मात्र यावेळी मुख्यमंत्री अनुपस्थित असल्याने विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवावा असा सल्ला दिला होता. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलं आहे.

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी रश्मी ठाकरे या उत्तमप्रकारे मुख्यमंत्रीपद सांभाळू शकतात असं वक्तव्य टीव्ही ९ शी बोलताना केलं आहे. ते म्हणाले की, “रश्मी ताईंची काम करण्याची पद्धत एक अभ्यासू महिला म्हणून आहे.

रश्मी ठाकरे पडद्याच्या पुढे नाहीत, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणापैकी बरंच राजकारण त्यांना माहिती आहे. त्या नेहमी उद्धव ठाकरेंसोबत असतात. उद्धव साहेबांचा आदेश असला तर मला वाटतं काहीही होऊ शकतं आणि त्यांच्यावर जबाबदारी देऊ शकतात.

सामनाच्या मुख्य संपादक म्हणूनही त्या उत्तम काम करत आहेत,” असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.लोकशाहीच्या मार्गाने लोकांपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे. त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे यासाठी राज्यात

 एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. तसा काही निर्णय झाला तर सर्व शिवसैनिक त्याचं स्वागत करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!