Friday, January 21, 2022

म्हणून मी बाईकवर नको ते चाळे केले त्या’ रोडरोमियोची पोलिसांसमोर कबुली, म्हणाले…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या औरंगाबादच्या व्हिडिओतील रोडरोमियोला पोलिसांनी अटक केली आहे. व्हिडिओत धावत्या दुचाकीवरून कपलने एकमेकांना मिठी मारत अश्लील चाळे करत सगळ्या सीमा ओलांडल्या होत्या.

रस्त्यावरून जाणाऱ्यानं या सीनचा व्हिडिओ काढला, त्यालाही ते अत्यंत लाजिरवाणं वाटलं. पण पाहता पाहता हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. औरंगाबाद पोलिसांनी या गोष्टीची दखल घेत अवघ्या 24 तासात या रोडरोमियोला अटक केली.

पोलिसांनी या रोडरोमियोचा तपास करून त्याला शोधले. एवढ्या जीवघेण्या आणि अश्लील कृत्याचे कारण विचारले. तेव्हा चौकशीतून सगळे सत्य समोर आले. सूरज गौतम कांबळे (23,रा. बीड बायपास) असे

या तरुणाचे नाव आहे. सूरज हा सूतगिरणी चौकातील कापड दुकानाच सेल्समन आहे. तो एमएमचे शिक्षण घेतो. वडील गवंडी काम करततात. त्याची प्रेयसीदेखील महाविद्यालयात शिक्षण घेते. हे दोघेही नातेवाईक असून काही दिवसात लग्न करणार आहेत, असे त्याने सांगितले.

सूरजने सांगितले, तो आणि त्याच्या मित्रांनी 31 डिसेंबरच्या रात्री तडप सिनेमाचे ट्रेलर पाहिले. मित्रांनी त्याला ट्रेलरमधील स्टंट करण्याचे चॅलेंज दिले. त्यानेही चॅलेंज स्वीकारत प्रेयसीला बोलावून घेतले. क्रांती चौक ते सेव्हन हिल आणि सेव्हन हिल ते क्रांती

चौक असा प्रवास करत हा स्टंट केला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शहरातील रस्त्यावर हे काय सुरु आहे, असे म्हणत कारवाईचे निर्देश दिले. पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे, उपनिरीक्षक

अनंता तांगडे आणि कर्मचाऱ्यांनी तपास करून त्याला ताब्यात घेतले. पोलीस कॉन्स्टेबल संतोष बमनावत यांनी त्याच्याविरोधात फिर्याद नोंदवली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!