Thursday, January 20, 2022

खुशखबर : 634 रुपयात मिळेल हा LPG सिलेंडर

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: देशांतर्गत गॅस कंपन्याही काळानुसार बदलू लागल्या आहेत. कंपन्यांनी आता घरगुती गॅस सिलेंडरमध्येही बदल करण्यास सुरुवात केली आहे, यामध्ये मुख्य बदल

या सिलेंडरच्या वजनात होतो आहे. सामान्य गॅस सिलेंडर व्यतिरिक्त आता या कंपन्यांनी कंपोझिट गॅस सिलेंडर बाजारात आणले आहेत. वजनाने कमी असलेला या सिलेंडरची दिल्लीत किंमत 634 रुपये आहे.

दरम्यान देशभरातील काहीच शहरात ही सुविधा दिली जात आहे.इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार या कंपनीची सुविधा महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, ठाणे याठिकाणी कंपोझिट गॅस सिलेंडर उपलब्ध आहे.

इंडियन आइलच्या वेबसाइटनुसार, महाराष्ट्रामध्ये या सिलेंडरची किंमत 634 रुपये आहे.कंपोझिट सिलेंडर लोखंडाच्या सिलेंडरपेक्षा वजनाने 7 किलो हलका आहे. या एलपीजी सिलेंडरमध्ये तीन थर असतात. सध्या वापरल्या जाणाऱ्या

रिकाम्या सिलेंडरचे वजन 17 किलो आहे. गॅस भरल्यावर त्याचे वजन 31 किलोपेक्षा थोडे जास्त असते. आता ग्राहकांना 10 किलोच्या कंपोझिट सिलेंडरमध्ये 10 किलो गॅसच मिळेल. अशाप्रकारे याचे एकूण वजन 20 किलो असेल.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!