Monday, January 17, 2022

महिलांसाठी आनंदाची बातमी!केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन आले आहे. त्यांच्यासा खास योजना आणली आहे. महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेतील महत्त्वाचा हेतू आहे.

केंद्र सरकारने महिलांचा विचार करुन ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आणली आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून महिलांना ६ हजार रुपये मिळणार आहे. काय आहे ही योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो जाणून घ्या.

केंद्र सरकारने देशातील महिलांच्या दृष्टीने पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आणली आहे. १ जानेवारी २०१७ मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला. या योजनेतंर्गत आधी पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यात येत होती.

पंतप्रधान गर्भावस्था मदत योजना या नावाने ही योजना आधी ओळखण्यात येत होती. म्हणजेच गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आई वडिलांचे आधार कार्ड, आई वडिलांचे ओळखपत्र,

मुलाचा जन्मदाखला आणि बँक खात्याचे पास बुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटवर भेट द्या.

आई आणि मुलांची चांगल्या प्रकारे देखभाल करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारकडून या महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महिलांना हे पैसे तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये,

दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येतील आणि बाळाचा जन्म झाल्यावर शेवटच्या आणि चौथ्या टप्प्यातील १ हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!