Tuesday, January 18, 2022

SBI ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! आता 5 लाखांपर्यंतचे….

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:स्टेट बॅंक ऑफ इंडिया ने सांगितले की, YONO App सह इंटरनेट बॅंकिंग आणि मोबाईल बॅंकिंगद्वारे केलेल्या 5 लाख रुपयांपर्यंतच्या तत्काळ पेमेंट सेवा व्यवहारांसाठी कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही.

ग्राहक आता IMPS द्वारे 5 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट त्वरित करू शकतील. यापूर्वी ही मर्यादा 2 लाख रुपये होती.तथापि, तुम्ही बॅंकेच्या शाखेत जाऊन IMPS केल्यास, तुम्हाला जीएसटीसह (GST) सेवा शुल्क भरावे लागेल.

बॅंकेने ट्‌विटरवर ही माहिती दिली आहे. बॅंकेने दिलेल्या माहितीनुसार, बॅंकेच्या शाखांमधून केल्या जाणाऱ्या IMPS व्यवहारांसाठी 2 लाख ते 5 लाख रुपयांचा नवा स्लॅब करण्यात आला आहे. या स्लॅब अंतर्गत येणाऱ्या रकमेवर सेवा शुल्क “20 रुपये + GST’ असेल.

या सूचना 1 फेब्रुवारी 2022 पासून लागू होतील.डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहनएसबीआयच्या म्हणण्यानुसार, डिजिटल बॅंकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ऑनलाइन बॅंकिंगद्वारे IMPS व्यवहारांवर सेवा शुल्क लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा व्यवहार YONO ऍप, इंटरनेट बॅंकिंग / मोबाईल बॅंकिंगद्वारे केला जाऊ शकतो.IMPS अंतर्गत, 1,000 रुपयांपर्यंतच्या व्यवहाराच्या रकमेवर कोणतेही सेवा शुल्क आकारले जात नाही. 1,001 ते 10,000 रुपयांपर्यंत 2 रुपये + GST चे शुल्क लागू आहे. 10,001 ते1 लाख

रुपयांपर्यंतच्या व्यवहारांवर 4 रुपये + GST शुल्क आकारले जाते. 1 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी 2 लाखांपर्यंत 12 रुपये + GST लागू आहे. हे शुल्क फक्त बॅंकेच्या शाखेतून केलेल्या व्यवहारांवर लागू आहे.IMPS ही एक अभिनव रिअल टाइम पेमेंट सेवा आहे.

जी 24 तास उपलब्ध असते. ही सेवा नॅशनल पेमेंट्‌स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे ऑफर केली जाते. हे ग्राहकांना संपूर्ण भारतातील बॅंका आणि RBI द्वारे अधिकृत प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट इश्‍युअर्स द्वारे त्वरित पैसे हस्तांतरित करण्यास सक्षम करते.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!