Sunday, June 4, 2023

ऊस तोडणी यंत्रा अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची दि.२१ एप्रिल पासून सुरूवात

WhatsApp Image 2023-02-28 at 6.34.18 PM
takshashila pravesh dene surur2
previous arrow
next arrow
Shadow
spot_img

पुणे

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कसतोडणी यंत्रास अनुदान योजना सन २०२३-२४ करिता दि.२१ एप्रिल पासून सुरूवात होणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.

साखर आयुक्तानी प्रसिद्धिस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने दि. २०/०३/२०२३ शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सदरची योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार आहे. ऊस तोडणी ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी वैयक्तिक व्यावसाईक यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्दतीने ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करावेत.

*इच्छुक अर्जदारांनी महा डीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करणे:–

कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या ऊस तोडणी यंत्र निवडीवे स्वातंत्र्य देण्यांत आले आहे. या योजनेतंर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणी प्रगतीचे प्रभावी सनियंत्रण करणे शक्य होणार आहे.

*योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे टप्पेः–
१) संकेतस्थळ https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login हे महा डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भराया. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC) ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकतील.

२) अर्जदार नोंदणी अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव (User Name) व संकेत शब्द (Password) तयार करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करून त्यांचे प्रोफाईल तयार करावे. अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” व “शेती सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संस्था / साखर कारखाने असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील. अर्जदारांनी पर्याय निवडल्यानंतर महा डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती युजर मैन्युअलद्वारे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे.

३) अर्जदाराने वैयक्तिक तपशील भरणे वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे. या सदरामध्ये तारांकित (+) बाबींची माहिती देणे अनिवार्य आहे. सदर गाहिती भरल्यानंतरच लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करता येईल.

४) अर्ज शुल्क:– ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना रक्कम रु. २०/- अधिक रक्कम रु.३.६० पैसे वस्तू व सेवाकर असे एकूण रक्कम रू.२३.६० पैसे अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरावयाचे आहे.

*तक्रार/सूचना:– अर्जदारांना अर्ज करतेवेळी काही अडचणी येत असतील अथवा काही सूचना करावयाच्या असल्यास से महा डीबीटी पोर्टलवरील तक्रारी/ सूचना” या बटनावर क्लिक करून आपली तक्रार/ सूचना नोंदवू शकतील. साखर कारखाने व गटांसाठी अर्ज करण्याची सुविधा दि. २१.४.२०२३ पासून सुरू होणार आहे.

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!