Tuesday, January 18, 2022

शरद पवारांच्या अध्यक्षतेखालील बैठकीनंतर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक झाली.मुंबईसह राज्यात करोना रुग्णांच्या वेगाने वाढणाऱ्या संख्येच्या

पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत पक्षाचे मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झालेल्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे.

या महिन्यात पक्षाची होणारी सर्व नियोजित शिबिरे आणि सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या मंत्र्यांची आणि नेत्यांची महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर मलिक यांनी राज्यातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर बैठकीत चिंता व्यक्त केल्याचे सांगितले. गर्दी टाळण्यासाठी

पक्षाचे सर्व नियोजित दौरे आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मंत्री किंवा नेत्यांनी गर्दी होईल असे कार्यक्रम घेऊ नयेत, असा निर्णय या बैठकीत झाल्याचे मलिक यांनी सांगितले. मात्र मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यांत

जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षांतर्गत होणार्‍या निवडणुकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. शिवाय आगामी ज्या निवडणुका होणार आहेत, त्याची तयारी पक्षाने केली आहे, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!