Tuesday, January 18, 2022

अत्यंत महत्त्वाचे:होम आयसोलेशनबाबत नव्या मार्गदर्शक सूचना जारी

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय लवकरच अनेक नियम बदलणार आहे. त्यात सर्वात मोठा बदल होम आयसोलेशन च्या मार्गदर्शक तत्त्वात झालाय.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ते जारी केलेत. आरोग्य मंत्रालयानं सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीत. सात दिवस पॉझिटिव्ह राहिल्यानंतर आणि तीन दिवस ताप नसेल

तर रुग्णाला होम आयसोलेशनच्या नवीन नियमांनुसार डिस्चार्ज दिला जाईल आणि अलगीकरण संपेल, असं मंत्रालयानं म्हटलंय.आरोग्य मंत्रालयानं म्हटलं, की होम आयसोलेशनचा कालावधी संपल्यानंतर पुन्हा चाचणी करण्याची आवश्यकता नाही.

आकडेवारीनुसार, गेल्या 9 दिवसांत देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 6 पटीनं वाढलीय. ओमिक्रॉन व्हेरिएन्टच्या केसेस तीन दिवसांत दुप्पट होत आहेत. लोकांनी रुग्णालयाकडे कमी वळावं. यासाठी नवीन होम आयसोलेशन गाइडलाइन आवश्यक आहेत.

दक्षिण आफ्रिकेतल्या डेल्टा प्रकारामुळे जेवढा विद्ध्वंस झाला नाही तेवढा विद्ध्वंस भारतात होण्याच्या शक्यतेनं आरोग्य मंत्रालय चिंतित आहे. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन भारतात कसा असेल, याबाबत संभ्रमाची स्थिती आहे.

रुग्णांची संख्या वाढल्यास रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही वाढेल. होम आयसोलेशनच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी, राज्यांना नियंत्रण कक्ष व्यवस्थित ठेवण्यास सांगितलंय. नियंत्रण कक्षाचं

 काम असं असेल, की याद्वारे राज्ये योग्य प्रकारे देखरेख ठेवू शकतील आणि जेव्हा रुग्णाची तब्येत बिघडते आणि त्याला होम आयसोलेशनमधून रुग्णालयात दाखल करावं लागतं, अशा स्थितीत रुग्णवाहिकेपासून ते रुग्णालयातल्या खाटांपर्यंत सर्वच बाबी करणं सहज शक्य होतं.

वृद्ध रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार होम आयसोलेशनची परवानगी दिली जाईल. सौम्य लक्षणं असलेले रुग्ण घरीच राहतील. यासाठी योग्य व्हेंटिलेशन असणं आवश्यक आहे. रुग्णाला ट्रिपल लेयर मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आलाय.

याशिवाय रुग्णाला जास्तीत जास्त द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्याचवेळी एचआयव्ही बाधित किंवा प्रत्यारोपण झालेल्या आणि कर्करोगाच्या रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच होम आयसोलेशनमध्ये जाण्याची परवानगी दिली जाईल.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!