Friday, January 21, 2022

नगर ब्रेकिंग :खून करून रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकला

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आपल्या रस्त्यातील काटा दुर करण्यासाठी एका 22 वर्षीय तरुणाला ठार करण्यात आले. तर हा अपघात आहे असे भासविण्यासाठी त्यास रस्त्याच्या कडेला एका विरळ गवतात फेकूण दिले गेले.

हा धक्कादायक घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडवर घडला. हा अपघात आहे असे म्हणून याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती.

मात्र, त्याचे शवविच्छेदन केले असता एक महिन्यानंतर वैद्यकीय अहवाल आला असता हा अपघात नसून खून आहे हे सिद्ध झाले. त्यानंतर संगमनेर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे यांनी दिलेल्या

फिर्यादीनुसार तत्काळ कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करुन घेतला असून या घटनेचा सखोल तपास सुरू केला आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, एक महिन्यांपुर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या गोरे यांना फोन आला होता.

समोरुन बोलणार्‍या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितले की, घुलेवाडी परिसरात संगमनेर साखर कारखान्याकडे जाणार्‍या रोडच्याकडेल गवतात एका तरुण मुलाचा मृतदेह पडला आहे. तेव्हा पोलीस निरीक्षक देशमुख यांना तत्काळ पोलीस पाठवून घटनेची शाहनिशा करण्यास सांगितले होते.

मात्र, तो रस्ता प्रचंड वर्दळीचा असल्यामुळे, रात्री अपरात्री कोण्या एका गाडीने संबंधित तरुणास पायी जात असताना उडविले असावे.! अशा प्रकारची धारणा झाली. मात्र, त्याच्या शरिरावर जवळजवळ अनेक जखमा होत्या. तर डोक्याला मार देखील लागलेला होता.

आता जो कोणी पोलिस असेल त्यांनी फार टेन्शन घेण्याचे काम केले नसावे. त्यामुळे, या मयत प्रकरणी त्यांनी पंचनामा केला आणि कागदी घोडे नाचवून पुढे मृतदेहाची विल्हेवाट करण्यास सुरूवात केली.दुर्दैवाने या तरुणाचे नाव काय माहिती नाही, कोणी

मारले माहित नाही, कसा व का मारला माहिती नाही, हा कुठला आहे. हे देखील माहित नाही त्यामुळे, मृत्यु नंतर देखील त्याच्या मृतदेहची अवहेलना झाली. 174 प्रमाणे नोंद करुन त्याच्या खुन्याचा पहिला

प्लॅन सक्सेस झाला. तर, दुसरी दुदैवी गोष्ट म्हणजे, त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याचे कोणी नातेवाईक नसल्याने तो मृतदेह अंत्यविधी करता आला नाही. तर त्यास बंद पेटीत ठेवण्यात आले. त्यानंतर संगमनेर नगरपरिषद यांना अंत्यतविधीसाठी

पत्र दिले असता त्यांनी सांगितले की, मयत हा घुलेवाडी शिवारात मिळून आला आहे. त्यामुळे, आमच्याकडे त्याचा अंत्यविधी होणार नाही. त्यामुळे, पोलीस हतबल झाले आणि त्यांनी घुलेवाडी गाठली. दुर्दुैवाने घुलेवाडी देखील या मृतदेहाला

गाडण्यासाठी जागा मिळाली नाही. त्यामुळे, पोलिसांनी अखेर वेल्हाळे ग्रामपंचायतीला पत्र दिले आणि किमान एक मृतदेह गाडण्यासाठी तरी जागा द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर या नागरिकांनी अगदी हळव्या मनाने मयत तरुणावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा दिली आणि स्वत: मदत देखील केली.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!