Tuesday, January 18, 2022

या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी 71 लीटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: पेट्रोल-डिझेलचे भाव सध्या सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे आहेत. उत्पादन शुल्क कमी होऊनही इंधनाचे दर अवकाशाला भिडले आहेत. अशावेळी पेट्रोल-डिझेल विकत घेताना

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड तुमच्या फायद्याचे ठरेल. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला दरवर्षी 71 लीटरपर्यंत पेट्रोल-डिझेल मोफत मिळू शकेल.वेगवेगळ्या कंपन्यांची क्रेडिट कार्ड्स ग्राहकांना

त्यांनी जमवलेले रिवॉर्ड पॉइंट रिडीम करण्याचे वेगवेगळे पर्याय देतात. तुम्ही IRCTC को-ब्रँडेड क्रेडिट कार्डवर जमा केलेले रिवॉर्ड पॉइंट रिडीम करून ट्रेन तिकीट बुक करू शकता. काही क्रेडिट कार्ड फ्यूल रिटेलर्ससह को-ब्रँडिंग करुन जारी केले

जातात आणि त्यात रिवॉर्ड पॉइंट्सच्या बदल्यात पेट्रोल-डिझेल ऑफर केले जाते.इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्ड हे असे कार्ड आहे ज्यावर ग्राहकांना मिळवलेल्या पॉइंट्सच्या  बदल्यात पेट्रोल आणि डिझेल मिळते. या कार्डचा वापर करून

मिळवलेले रिवॉर्ड पॉइंट्स (टर्बो पॉइंट्स) रिडीम करून, ग्राहक दरवर्षी 71 लीटरपर्यंत पेट्रोल आणि डिझेल खरेदी करू शकतात. अर्थात ही खरेदी करताना तुमच्याकडे जमा झालेले रिवॉर्ड पॉइंट्स खर्च होतात, तुम्हाला नवीन रक्कम भरण्याची आवश्यकता नाही.

1. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर टर्बो पॉइंट्स रीडिम करून वार्षिक 71 लीटरपर्यंत पेट्रोल फ्री

2. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर 1 टक्का फ्यूअल सरचार्ज माफ

3. इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर प्रति 150 रुपयांच्या खर्चावर 4 टर्बो पॉइंट्स मिळतील

4. या कार्डच्या माध्यमातून ग्रोसरी किंवा सुपरमार्केटमध्ये शॉपिंग केल्यास प्रत्येक 150 रुपयांच्या खर्चावर 2 टर्बो पॉइंट्स मिळतील

5. कार्डच्या माध्यातून अन्य कॅटेगरीसाठी प्रति 150 रुपयांच्या स्पेंडिंगवर 1 टर्बो पॉइंट मिळेल

टर्बो पॉइंट्स विविध प्रकारे रीडिम करता येतील मात्र तुम्ही हे इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर हे पॉइंट्स रीडिम केल्यास अधिक फायद्याचे ठरेल

>> इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर रिडम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = 1 रुपये

>> goibibo.com, IndiGo, Make My Trip, yatra.com वर रिडम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = 25 पैसे

>> Book my Show, Vodafone वर रिडम्पशन रेट- 1 टर्बो पॉइंट = 30 पैसे

ग्राहकांना आणखी काय फायदे मिळतील?

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डवर 71 लीटरपर्यंत इंधन मोफत मिळण्यासह इतरही काही फायदे मिळतात. जाणून घ्या काय आहेत या कार्डवर मिळणारे इतर फायदे-

>> वार्षिक 30 हजार रुपये खर्च केल्यास 1000 रुपये अॅन्युअल फी माफ करण्यात आली आहे.

>> कार्ड सक्रिय केल्यावर, तुम्हाला रु. 250 किमतीचे टर्बो पॉइंट्स मिळतील.

>> याशिवाय 3650 रुपयांचे अतिरिक्त पॉइंट्सही उपलब्ध आहेत.

>> तुम्ही या कार्डद्वारे संपर्करहित पेमेंट करू शकता.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!