Monday, January 17, 2022

नगर जिल्ह्यासह या जिल्ह्यांना पावसाचा इशारा, उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मागील काही दिवसांपासून मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पडली होती. यानंतर आता राज्यातील किमान तापमानात किंचितशी वाढ झाली असून राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण झालं आहे.

उद्यापासून राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.

उद्या धुळे आणि नंदुरबार या दोन जिल्ह्यात ढगाळ हवामानाची स्थिती राहणार असून पुढील चोवीस तासाच या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 7 जानेवारीनंतर राज्यात हळुहळू पावसाचा जोर वाढणार आहे.

शुक्रवारी (7 जानेवारी) नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे. त्यानंतर 8 आणि 9 जानेवारीला मात्र उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कोसळणार आहे.

8 जानेवारी रोजी हवामान खात्याने बुलडाणा, वर्धा, अकोला, नागपूर आणि अमरावती या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यासोबत ठाणे, पालघरसह उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळणार आहेत.

तर रविवारी हवामान खात्याने वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. संबंधित जिल्ह्यात विकेंडला विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...

या आमदाराची जीभ घसरली! रस्ते कंगना राणौतच्या गालापेक्षा चांगले करणार

माय महाराष्ट्र न्यूज:अभिनेत्री कंगणा रणौतविषयी वादग्रस्त वक्तव्य करून काँग्रेस आमदार डॉ. इरफान अन्सारी वादात सापडण्याची शक्यता आहे. जामताडामधील रस्ते कंगना रणौतच्या गालापेक्षाही चिकने बनवले...
error: Content is protected !!