Thursday, January 20, 2022

Omicron ला हलक्यात घेऊ नका! या ठिकाणी हॉस्पिटलमधल्या Corona रुग्णांची संख्या वाढली

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:Omicron हा नवा विषाणू सौम्य आहे आणि सर्दी, खोकला, बारिक ताप इतपतच लक्षणं दिसतात असं सांगणाऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये कोविड रुग्ण

संख्येचा उद्रेक झाला असून एका दिवसात वाढलेल्या संख्येनं आजवरचा जागतिक विक्रम नोंदवला आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला अमेरिकेत (USA) 10 लाख रुग्ण आढळल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेत हॉस्पिटलमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे.

गेल्या आठवड्यात त्यात 50 टक्के वाढ दिसून आली आहे. यात 59 टक्के रुग्ण ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले आहेत.गेल्या वर्षीच्या हिवाळ्यापेक्षा यंदाच्या हिवाळ्यात अधिक रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी अमेरिकेत

9 लाख 78 हजार 856 रुग्णांची नोंद झाली, तर मंगळवारी ही संख्या 5 लाख 70 हजारांच्या आसपास होती. कोविड रुग्णांच्या मृत्यूचा दर मात्र स्थिर आहे. अमेरिकेत मंगळवारी 1847 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आठवड्याभरात वाढलेली ही संख्या चिंताजनक असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. गेल्या आठवड्यात 4 लाख 86 हजार रुग्णांची नोंद झाली होती.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!