Friday, January 21, 2022

तुमच्या 15 ते 18 वयोगटातील मुलांना कोविडची लस घेताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:देशभरात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्याच दरम्यान 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू झाले आहे. या लसीचे कोणतेही दुष्परिणाम आतापर्यंत नोंदवले गेलेले नाहीत.

तथापि, पालकांनी सुद्धा लक्ष दिले पाहिजे की लस घेतल्यानंतर आपल्या मुलांमध्ये काही लक्षणे तर दिसून येत नाहीत. जर तुमच्या किशोरवयीन मुलांनी लस घेतली असेल किंवा ती घेण्याची तयारी करत असेल,

तर तुमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणे महत्त्वाचे आहे.लसीनंतर झाल्यानंतर त्याचे काही दुष्परिणाम प्रौढांमध्ये दिसून आले आहेत. त्यामुळे मुलांमध्ये देखील दुष्परिणाम दिसून येऊ शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. एका वृत्तसंस्थेने

दिलेल्या वृत्तानुसार, फोर्टिस हॉस्पिटलचे डॉ विकास मौर्य म्हणाले, “किशोरांना लसीनंतर काही सौम्य लक्षणे दिसू शकतात जसे की ताप, डोकेदुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना,

थकवा इ. लस दिल्यानंतर या व्यतिरिक्त काही विचित्र लक्षणे आढळल्यास पालकांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.लस दिल्यानंतर या मार्गदर्शक तत्वांचे पालन करा;लस दिल्यानंतर, अधिक पाणी पिणे, संतुलित

आहार घेणे यासारख्या आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.आहारात हिरव्या भाज्या, हळद, लसूण आणि व्हिटॅमिन सी समृद्ध फळे घ्या. यासोबतच ७ ते ८ तासांची गाढ झोप घेणे देखील आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!