Saturday, January 22, 2022

मोठी बातमी । एसटी महामंडळाची नवी भरती प्रक्रिया;संप मिटेना

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यात काही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. मात्र, एसटी महामंडळाने संपकरी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावूनही कामावर रुजू न झालेल्यांना बडतर्फ करुन घरी पाठवले. आता त्यापुढचे मोठे पाऊल उचलत नव्याने भरती प्रक्रिया सुरु केली आहे.

राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप मिटत नसल्याचे चित्र आहे. राज्य सरकार संप मिटवण्यासाठी पूर्ण प्रयत्नशील आहे. मात्र कर्मचारी विलनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे. अद्याप काही एसटी कर्मचारी संपावर आहेत.

मात्र, यातच एसटी महामंडळाने नव्याने कर्मचाऱ्यांनी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने नवी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.एसटीच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरुच आहे. एसटीच्या उर्वरित 55 हजार संपकरी

कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या 1144 असून एकूण निलंबित कर्मचारी संख्या 11024 इतकी आहे.

एसटी संप मिटत नसल्याने एसटीमध्ये सेवानिवृत्त, स्वेच्छा निवृत्त झालेल्या माजी चालकांना करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. त्याबद्दल एसटी महामंडळाने जाहिरात काढली आहे. एसटीचे राज्यशासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी

काही एसटी कर्मचाऱ्यांनी जवळ पास दोन महिने संप पुकारला आहे. तर काही कर्मचारी कामावर रुजू झाल्याने त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!