Saturday, January 22, 2022

कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतर पॅरासिटॅमोलची गरज नाही

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: कोव्हॅक्सिन ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर ताप किंवा अंग दुखत असल्यास त्यावर पॅऱासिटॅमोल ही टॅब्लेट घेण्याची गरज नाही, असं स्पष्टीकरण भारत बायोटेकनं दिलं आहे.

लहान मुलांच्या लसीकरणादरम्यान काही लसीकरण केंद्रांवर लस घेतल्यानंतर मुलांना पॅरासिटॅमोल किंवा पेनकिलर गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जात असल्याचं लक्षात आल्यानंतर लस निर्मात्या कंपनीनं यावर स्पष्टीकरण दिलं.

भारत बायोटेककडून एक पत्रकच जाहिर करण्यात आलं आहे. यामध्ये कंपनीनं म्हटलं की, आम्हाला फिडबॅक मिळालाय की, मुलांसाठीच्या काही लसीकरण केंद्रांवर ५०० मिलीग्रॅमच्या तीन पॅरासिटॅमोल टॅब्लेट घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

पण कोव्हॅक्सिनची लस घेतल्यानंतर पॅरासिटॅमोल किंवा कोणत्याही पेन किलर घेण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.आमच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ३०,००० लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये १० ते २० टक्के व्यक्तींना साईड इफेक्ट जाणवले आहेत.

बऱ्याच जणांमध्ये हे साईड इफेक्ट सौम्य स्वरुपाचे आहेत, जे एक-दोन दिवसात निघून जातात. त्यामुळं त्यासाठी कुठल्याही प्रकारचं औषध घेण्याची गरज नाही. केवळ तुमच्या डॉक्टरांनी जर औषध गरजेची आहेत अशी शिफारस केली तर लस घेतल्यानंतर औषधांची गरज पडते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!