Thursday, January 20, 2022

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, नव्या बाधितांचा आकडा थेट इतक्या हजार पार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट धडकली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये कोरोना पुन्हा हातपाय पसरु लागला आहे. गेल्या आठवड्याभरापासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या आकडेवारीत कमालीची वाढ झालेली बघायला मिळतेय.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात काल 18 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधितांचा आकडा वाढला होता. पण आज हाच आकडा थेट 26 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर सारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये प्रचंड मोठी रुग्णवाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आजच्या नव्या रुग्णसंख्येने तर कोरोनाच्या गेल्या दोन लाटांचे सर्व रेकॉर्ड्स मोडले आहेत. मुंबईत दिवसभरात तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण आढळले आहेत.

महाराष्ट्रात आज दिवसभरात 26 हजार 538 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 5 हजार 331 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून

डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 96.55 टक्क्यांवर पोहोचलं आहे.राज्यात दिवसभरात ओमायक्रोनच्या 144 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी मुंबईतील 100 रुग्णांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ

नागपुरातील 11 रुग्णांचा समावेश आहे. तसेच ठाणे आणि पुणे मनपा हद्दीत 7 रुग्ण आढळले आहेत. तर पिंपरी चिंचवडमध्ये 6, कोल्हापूरला 5, अमरावती, उल्हासनगर, भिवंडी महापालिका हद्दीत प्रत्येकी दोन नवे

ओमायक्रोनबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच पनवेल आणि उस्मानाबाद येथे प्रत्येकी 1 रुग्ण आढळले आहेत.

ताज्या बातम्या

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...

तुमच्या घरात कोरोनाबाधित व्यक्ती आहे? तर या टीप्स करा, कोरोनापासून रहा सुरक्षीत

माय महाराष्ट्र न्यूज:काही दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून आपला बचाव कसा करावा, तसेच जर आपल्या घरात एखाद्या...
error: Content is protected !!