Tuesday, January 18, 2022

शिक्षकाने ऑनलाईन क्लास दरम्यान शेअर केला पॉर्न VIDEO; 2 तासांपर्यंत हटवला नाही अश्लील प्रकार

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:शाळेच्या शिक्षकाने ऑनलाइन क्लासदरम्यान अॅपवर पॉर्न व्हिडीओची लिंक शेअर केली. लिंक पाठवताच अनेक विद्यार्थ्यांनी ती लिंक ओपन करून पाहायला सुरुवातही केली.

मुलांच्या लॅपटॉप-मोबाइलवर हे दृश्य पाहून विद्यार्थ्यांचे आई-वडील हैराण झाले. यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. मात्र अॅपचं सर्वर डाऊन असल्यामुळे अनेक तास लिंक हटवण्यात आली नाही. शहरभरात

या घटनेबद्दल चर्चा सुरू आहे. शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापकांनी हा मानवी चूक असल्याचं सांगून काहीही सांगण्यास नकार दिला. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.ही संपूर्ण घटना सरदारपूरा स्थित सेंट पॉल शाळेत 10 वीच्या

ऑनलाइन क्लासदरम्यान घडली होती. यादरम्यान सकाळी 8.30 वाजता दररोज प्रमाणे शाळेच्या अॅपवर शिक्षक लिंक शेअर करीत होते. यादरम्यान गणिताच्या शिक्षकानेही लिंक शेअर केली. विद्यार्थ्यांनीही लिंक क्लिक करून पाहिली तर तो पॉर्न मूव्हीचा यूआरएल होता.

अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना याबाबत माहिती दिली. यानंतर पालकांनी शाळेच्या व्यवस्थापकांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला.यानंतर तब्बल 2 तासांपर्यंत ही लिंक हटवण्यात आली नाही. सातत्याने पालक या कृत्याबद्दल

शाळेचे शिक्षक आणि व्यवस्थापकांवर संताप व्यक्त करीत होते. तर व्यवस्थापकांनी मानवी चूक असल्याचं सांगून पालकांची माफी मागितली. सध्या या प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. एका पालकाने दैनिक

भास्करला दिलेल्या माहितीनुसार, शाळेत त्यांचा मोठा मुलगा 10 वीच्या वर्गात शिकतो. मुलाने लिंक ओपन केली, तर अश्लील चित्रपट सुरू झाला. ही मानवी चूक असल्याचं सांगण्यात आलं. मात्र शेकडो मुलांपर्यंत अशा प्रकारची लिंक शेअर होतं, अत्यंत

लज्जास्पद असल्याची प्रतिक्रिया पालकांनी दिली जात आहे. या प्रकरणात शिक्षकाने सांगितलं की, अभ्यासाची लिंक शेअर करण्याऐवजी चुकून दुसऱ्या ग्रुपमधील लिंक कॉपी-पेस्ट झाली.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!