Wednesday, December 8, 2021

नगर जिल्ह्यातील तीन मंत्री व पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्‍यावर सोडला माजी मंत्र्यांची टीका

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज टिम :जिल्ह्यातील तीन मंत्री व पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्‍यावर सोडला आहे. पालकमंत्र्यांना येथे बैठक घ्यायला वेळ नाही, लोकप्रतिनिधींना भेट द्यायला वेळ नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे व ही गंभीर बाब आहे अशी टीका माजी मंत्री राम शिंदे.

जमावबंदीचे 144 कलम लागू असल्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करता येत नाही म्हणून भारतीय जनता पक्षाच्यावतीने आम्ही निवेदन दिले, असे सांगून ते म्हणाले, लोकांचे जीव वाचले पाहिजे यासाठी राज्य सरकारने व प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.

परंतु यापुढे ही सुधारणा न केल्यास वेगळ्या पद्धतीचा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. आपल्याकडे सोळाशे ऑक्जिन बेड असून, सव्वादोनशे व्हेंटिलेटर आहे आणि तीन हजार रेमडीसिवीर इंजेक्शनची गरज असताना फक्त 2 हजार मिळाले आहेत, असे सांगून प्रा. शिंदे म्हणाले.

जिल्ह्याची आरोग्य सुविधा वाढवण्याची गरज आहे. कोरोनाच्या पहिल्या फेजमध्ये सहा हजारापर्यंत रुग्णसंख्या गेली होती, पण या फेजमध्ये रोज 2 हजारावर रुग्ण होत आहे. ही भयानक स्थिती आहे. जिल्ह्यातील 3 मंत्री व पालकमंत्री काय करीत आहेत.

यात राजकारण आम्ही आणणार नाही व प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची आमची तयारी आहे. पण पालकमंत्री केवळ सहल करायची म्हणून येतात व बैठका घेतात. पण येथील जबाबदारी घ्यायची कोणी? बारा बलुतेदारांना वार्‍यावर सोडले आहे, असा आरोपही प्रा. शिंदे यांनी केलाख.

ताज्या बातम्या

‘त्या’ वादग्रस्त विधानाप्रकरणी इंदुरीकर महाराजांना तूर्तास दिलासा

माय महाराष्ट्र न्यूज: अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी महिलांनाबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात दाखल केलेल्या खटल्यात आज होणारी सुनावणी न्यायालयाने पुढे ढकलली आहे. तर...

त्या अभिनेत्रीला बलात्काराची धमकी;या खासदाराला द्यावा लागला राजीनामा

माय महाराष्ट्र न्यूज: अभिनेत्री माहिया माही हिला फोनवरून बलात्काराची धमकी दिल्यानंतर जमालपूरचे खासदार व देशाचे माहिती आणि प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

 सर्दी, घसा खवखवणे अशी लक्षणे असणाऱ्या 3 पैकी 1 व्यक्तीला प्रत्यक्षात कोविड असू शकतो

माय महाराष्ट्र न्यूज:गेले दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढा देत आहे. सध्या जगभरात लसीकरणाद्वारे यावर मात केली जात आहे. गेल्या अनेक महिन्यांमध्ये...

आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले हे महत्त्वाचे निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:राज्यातील न्यायसहायक विज्ञान संस्था मधून फॉरेन्सिक सायन्स पदवी व पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांना न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालयाच्या अधिनस्त राज्यातील विविध प्रयोगशाळांमध्ये प्रतिवर्षी 150...

एकदिवसीय ऊस गाळपात ‘ज्ञानेश्वर’चा नवा उच्चांक

नेवासा नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने सध्या सुरू असलेल्या सन 2021-22 च्या हंगामात दि.07 डिसेंबर रोजी प्रतिदिन  7000...

नगर जिल्ह्यात या घाटात मध्यरात्री चारचाकी वाहनाला आग वाहन पूर्णतः जळून खाक;उलट-सुलट चर्चा सुरू

माय महाराष्ट्र न्यूज :अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी घाट येथे मंगळवारी मध्यरात्री एका चारचाकी वाहनाला आग लागून या घटनेत हे चार चाकी वाहन पूर्णतः...
error: Content is protected !!