Friday, January 21, 2022

उद्यापर्यंत हे काम करा, अन्यथा तुमचं सिम कार्ड होईल ब्लॉक

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:आधुनिकतेच्या या युगात लोकांना अनेक प्रकारच्या सुविधा मिळत आहेत, ज्या पूर्वी उपलब्ध नव्हत्या. त्याचबरोबर अनेकजण या सुविधांचा गैरवापरही करतात. एवढेच नाही

तर हे लोक आपल्या गुन्ह्याचा खापर दुसऱ्याच्या माथ्यावर टाकतात. अशा बाबी लक्षात घेऊन दूरसंचार विभागाने गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी नवा आदेश जारी केला होता.या आदेशानुसार, नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या वापरकर्त्यांना

सिमकार्ड व्हेरिफिकेशन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तुमच्याकडेही नऊ पेक्षा जास्त सिमकार्ड असतील, तर तुम्ही 7 जानेवारीपूर्वी त्याची व्हेरिफिकेशन करून घ्यावी, असे न केल्यास तुमचे सिम कार्ड रद्द केले जाईल.

हा नियम गेल्या वर्षी 7 डिसेंबर रोजी लागू करण्यात आला होता.ज्यामध्ये 30 दिवसांचा कालावधी देऊन 6 जानेवारी हा शेवटचा दिवस ठेवण्यात आला होता.तुमच्या नावावर जर 9 पेक्षा जास्त सिम कार्ड रजिस्टर्ड असतील

तर तुम्ही ताबडतोब तुमच्या सिमचे व्हेरिफिकेशन करून घ्या. तुम्ही 7 जानेवारीपूर्वी हे न केल्यास, तुमची आउटगोइंग सेवा बंद केली जाईल. त्याचबरोबर 45 दिवसांत इनकमिंग कॉल सेवा बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सिमचे व्हेरिफिकेशन

न झाल्यास 60 दिवसांत सिमकार्ड सुविधा बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय रोमिंग, आजारी आणि अपंग व्यक्तींनाही या कामासाठी अतिरिक्त 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.जर तुम्ही सिम कार्डचा वापर करीत नसाल तर सिम सरेंडरचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!