Tuesday, January 18, 2022

नगर ब्रेकिंग:झाडाला गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे रवींद्र एकनाथ होन (वय 30) या तरुणाने आपल्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला सतीश एकनाथ होन यांनी फिर्याद दिली असून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. चांदेकसारे-सोनेवाडी गोरक्षनाथ रोड लगत होन यांची वस्ती व शेती आहे. सकाळी सतिश होन

हे आपल्या शेतात चक्कर मारण्यासाठी गेले असता त्यांना आपल्या शेतात लिंबाच्या झाडाला रवींद्र एकनाथ होन यांचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. त्यांनी तात्काळ शेजारी असलेले बंधू पंकज होन अन्य नातेवाईकांना

यांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतले. घटना गंभीर असल्याने पोलीस पाटील मिराताई रोकडे, माजी सरपंच केशवराव होन व डॉ. गोरक्षनाथ होन यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना यासंदर्भात माहिती दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी तात्काळ सहाय्यक फौजदार अशोक आंधळे व त्यांच्या टीमला घटनास्थळी पाठवले. मयत झालेल्या रवींद्र होन यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी कोपरगाव तालुका ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.

शवविच्छेदन केल्यानंतर होन यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात चांदेकसारे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 2/2022 लीलि/74 प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद केली असून ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अशोक आंधळे व श्री. कुसारे पुढील तपास करीत आहे.

ताज्या बातम्या

भेंड्यात बिबट्याकडून शेळीचा फडशा

भेंडा नेवासा तालुक्यातील भेंडा परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर सुरु झाला असून सोमवारी सांयकाळी 7 वाजेच्या सुमारास बिबट्याने भेंडा-देवगाव रस्त्यावरील श्रीकांत भिमराज शिंदे यांचे वस्तीवर अंगणात बांधलेल्या...

सभापती डॉ.क्षितिज घुलेंच्या वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना ब्लॅंकेटचे वाटप

शेवगाव लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक व शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांचे वाढदिवसानिमित्त ऊसतोडणी मजुरांना उबदार ब्लॅंकेटचे...

श्रीरामपूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड

श्रीरामपूर येथील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बाळासाहेब भांड, उपाध्यक्षपदी विष्णू वाघ, सेक्रेटरी बाळासाहेब आगे, तर खजिनदारपदी प्रकाश कुलथे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथील विश्रामगृहावर प्रेस क्लबच्या...

नगर ब्रेकिंग :विवाहितेचा सासरी छळ पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यात बांधकाम करण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावेत. या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. ही घटना...

हे गाव झाले सॅनिटरी नॅपकिन मुक्त; गावातल्या महिलांनी स्वीकारला नवा पर्याय

माय महाराष्ट्र न्यूज:मासिक पाळीच्या काळात कापड वापरणं आणि त्यातून होणारी इन्फेक्शन्स, दुर्गंधी, रॅश, कापड ओले राहिल्याने घासले जाते त्यातून होणाऱ्या जखमा हे सारं गंभीर...

अत्यंत महत्त्वाचे:आधार कार्डच्या ‘या’ नियमात बदल

माय महाराष्ट्र न्यूज:भारतात आधारकार्ड हा अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. शाळा कॉलेजपासून नोकरीच्या ठिकाणापर्यंत तसेच विविध सरकारी योजनांचे लाभ घेण्यासाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी आणि आर्थिक...
error: Content is protected !!