Saturday, January 22, 2022

बाहेरुन पाठिंबा चालेल का? पंकजांचा प्रश्न, रोहित पवार म्हणतात…

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार , माजी मंत्री नेत्या पंकजा मुंडे व काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नुकतीच झी मराठी वाहिनीवरील ‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी खाद्यपदार्थ

बनवण्यासाठी करायच्या मदतीवरुन ‘बाहेरुन पाठिंबा चालेल का?’ असा सूचक प्रश्न पंकजा मुंडे यांनी रोहित पवारांना विचारला. त्यावर ‘आताचं सेशन बघितल्यानंतर भाजपचा बाहेरुन पाठिंबा असल्यासारखं वाटतंय’ असं प्रत्युत्तर रोहित पवार यांनी दिलं.

‘किचन कल्लाकार’ या कार्यक्रमात तीन सेलिब्रिटी सहभागी होतात. त्यानंतर महाराज अर्थात दिग्गज अभिनेते प्रशांत दामले प्रत्येकाला एक-एक पदार्थ बनवण्यासाठी सांगतात. त्यातून उत्तम

पदार्थ बनवणारा सेलिब्रिटी त्या दिवसाचा विजेता ठरतो. पंकजा मुंडे यांना चिकन रस्सा, रोहित पवार यांना पोहे किंवा उपमा, तर प्रणिती शिंदे यांना उसळ भाकरी हे पदार्थ करण्याचं आव्हान देण्यात आलं.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संकर्षण कऱ्हाडेने स्पर्धेचे नियम समजावून सांगताना राजशेफची भूमिका स्पष्ट करुन सांगितली. राजशेफ अर्थात मधुराज् रेसिपी फेम मधुरा बाचल स्पर्धकांना मदत करु शकतात.

मात्र त्यांचे हात बांधलेले असणार, त्या प्रत्यक्ष पदार्थ बनवण्यात मदत करु शकणार नाहीत, केवळ सूचना देतील, थोडक्यात बाहेरुन पाठिंबा आहे, अशी मिश्कील टिपणी संकर्षणने केली. त्यावर बोलताना, ‘असं चालेल का रोहित? बाहेरुन पाठिंबा वगैरे’ असा

तिरकस प्रश्न पंकजांनी विचारला. तेव्हा ‘आताचं सेशन बघितल्यानंतर भाजपचा बाहेरुन पाठिंबा असल्यासारखं वाटतंय’ असं उत्तर रोहित पवार यांनी दिलं.ताई सगळ्यांनाच खाऊ घालतात, काँग्रेस झालं, राष्ट्रवादीलाही कधीतरी आमंत्रण द्या,

नवनवीन आमदारांना’ असंही रोहित पवार पंकजांना म्हणाले. त्यावर ‘मी तुम्हाला आमंत्रण द्यायला तयार आहे, तुम्हाला जे आवडतं, ते खाऊ घालायची माझ्याकडे कला आहे.’ असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!