Friday, January 21, 2022

महाराष्ट्रात कठोर निर्बंधांबाबत निर्णयाची शक्यता

IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
IMG-20210928-WA0001
okk
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:मुंबईसह महाराष्ट्रात करोना  रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल, बुधवारी करोना रुग्णांची संख्या २६ हजारांपार नोंदवली गेली आहे. ही आकडेवारी लक्षात घेता राज्यात लवकरच कठोर निर्बंध लागण्याची

शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन निर्बंधांसंबंधी आज, गुरुवारी महत्वाची बैठक होऊ शकते आणि त्यात काही निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईसह महाराष्ट्रातील करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंधांबाबत आज, गुरुवारी महत्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. यात

कार्यालयीन उपस्थिती आणि दुकाने, रेस्तराँच्या वेळांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. लोकल प्रवासावरील निर्बंधांबाबतही काही निर्णय घेतला जाऊ शकतो. करोनाचा वाढता प्रादूर्भाव बघता, लवकरच

नवीन कठोर निर्बंध लादले जाऊ शकतात, यात काहीच शंका नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.राज्यातील करोना वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव याबाबत आढावा घेतल्यानंतर काल, बुधवारी राजेश टोपे यांनी

माध्यमांना माहिती दिली होती. राज्यात तूर्तास संपूर्ण लॉकडाउन लागण्याची शक्यता नाही. मात्र, काही अनावश्यक सेवा आणि गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लागू करण्याचा विचार आहे, असे टोपे म्हणाले होते. सध्याच्या घडीला शंभर टक्के लॉकडाउन

लावण्याचा कोणताही विचार नाही. गरज भासल्यास काही निर्बंध लागू करण्यात येतील, असे सूतोवाच त्यांनी केले होते.

ताज्या बातम्या

Dysp संदीप मिटके यांना “सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी” पुरस्कार जाहीर

श्रीरामपूर श्रीरामपूरचे पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके यांना सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी पुरस्कार देण्यात आला असून पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबतचे प्रशस्तीपत्र आणि रोख २५ हजार रुपये...

भगवानबाबा राष्ट्रीय क्रांतिकारी संत-अमोल अभंग

नेवासा संत भगवानबाबांचे वारकरी संप्रदायाबरोबरच तंटामुक्ती, व्यसनमुक्ती, स्वच्छता मोहीम व शैक्षणिक क्षेत्रातही मोठे योगदान आहे. ते सर्वधर्मसमभाव मानणारे परिवर्तनशील व क्रांतिकारी राष्ट्रीय संत होते असे...

नगर जिल्ह्यात कांदा 3000 तर सोयाबीनला हा भाव….

माय महाराष्ट्र न्यूज: अहमदनगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत काल मंगळवारी कांद्याच्या 6620 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल कांद्याला जास्ती जास्त 3000 रुपये इतका भाव मिळाला. कांदा...

विखे-पाटील म्हणतात ते वक्तव्य अतिशय गंभीर गृहविभागाने दखल घेवून कारवाई करावी

माय महाराष्ट्र न्यूज:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी केलेले वादग्रस्त विधान अतिशय निषेधार्ह असून, नैराश्याच्या भावनेतून आपण काय बोलतो याचेही भान कॉग्रेस पक्षाच्या...

नगर जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने प्रशासनाने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

माय महाराष्ट्र न्यूज:नगर जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असून गेल्या २४ तासांत दैनंदिन रुग्णसंख्या दीड पटीने वाढली आहे. मंगळवारी २४४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर नव्या...

सावकाराच्या जाचाला कंटाळून इसमाने लावला गळफास

माय महाराष्ट्र न्यूज : राजापूर येथे सावकाराच्या जाचाला कंटाळून एका इसमाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. अण्णासाहेब निवृत्ती नवले...
error: Content is protected !!